दोडी येथील वृत्तपत्रविक्रेते आंबेकर यांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:38+5:302021-05-08T04:14:38+5:30

संजय आंबेकर हे मूळ सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील रहिवासी आहेत. दोडी येथील वृत्तपत्राचे ते वितरक आहेत. नेहमीप्रमाणे ते आपल्या ...

Ambekar, a newspaper vendor from Dodi, died in an accident | दोडी येथील वृत्तपत्रविक्रेते आंबेकर यांचा अपघाती मृत्यू

दोडी येथील वृत्तपत्रविक्रेते आंबेकर यांचा अपघाती मृत्यू

संजय आंबेकर हे मूळ सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील रहिवासी आहेत. दोडी येथील वृत्तपत्राचे ते वितरक आहेत. नेहमीप्रमाणे ते आपल्या दुचाकीहून दोडी येथे वृत्तपत्र वितरण करुन घराकडे परत येत असताना दोडी शिवारात हॉटेल शोभा पॅलेसजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यानंतर त्यांची दुचाकी दुभाजकावर आदळून त्यात आंबेकर यांचा मृत्यू झाला. आंबेकर यांचे दोडी येथे लॉन्ड्रीचे दुकान आहे. तथापि, लॉकडाऊनमुळे ते बंद असल्याने केवळ वृत्तपत्र वितरणावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. आंबेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे. आंबेकर यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. के. अढांगळे अधिक तपास करीत आहेत.

फोटो - ०७ संजय आंबेकर

मृत संजय आंबेकर

===Photopath===

070521\07nsk_27_07052021_13.jpg

===Caption===

 फोटो - ०७ संजय आंबेकर 

Web Title: Ambekar, a newspaper vendor from Dodi, died in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.