आंबेडकर जयंतीनिमित्त शहर निळेमय
By Admin | Updated: April 13, 2017 00:25 IST2017-04-13T00:25:21+5:302017-04-13T00:25:42+5:30
आंबेडकर जयंतीनिमित्त शहर निळेमय

आंबेडकर जयंतीनिमित्त शहर निळेमय
नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासून (दि. १४) शहर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकर जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून, ध्वज आणि पताकांनी शहर परिसर निळेमय झाला आहे. दरम्यान, जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला रात्री बारा वाजता ठिकठिकाणच्या आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. शहरातील शिवाजी मार्गावरील पुतळ्याला मनपाच्या वतीने महापौर रंजना भानसी पुष्पहार अर्पण करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने शहरात भीमसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांवर निळेध्वज फडकू लागले आहेत. आंबेडकर पुतळ्यांभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांना निळे ध्वज लावण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)