गुजरातमधून आंब्यांची आवक
By Admin | Updated: May 6, 2017 23:36 IST2017-05-06T23:36:39+5:302017-05-06T23:36:55+5:30
गुजरात राज्यातून तालुक्यात विविध प्रकारचे आंबे बाजारपेठेमध्ये दिसून येत असल्याने गुजरातमधून सुरू झालेल्या अर्थप्रणालीचा प्रवाह गुजरातकडे वळला आहे.

गुजरातमधून आंब्यांची आवक
प्रवीण दोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दिंडोरी तालुक्यातुन उच्चतम प्रतिची द्राक्षे गुजरात राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेनंतर आता गुजरात राज्यातून तालुक्यात विविध प्रकारचे आंबे बाजारपेठेमध्ये दिसून येत असल्याने द्राक्षाच्या माध्यमातून गुजरातमधून सुरू झालेल्या अर्थप्रणालीचा प्रवाह आंब्याच्या माध्यमातून पुन्हा गुजरातकडे वळला आहे.
डिसेंबर ते मे या सहा महिन्यांच्या कालावधीत गुजरात राज्यातील बिल्लीमोरा, भरूच, नवसारी, सूरत बडोदा, अहमदाबादपासून गुजरात व राजस्थानच्या मध्यान्ह सीमेपर्यंत दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे विक्र ीसाठी पाठविण्यात येतात. सोनाका, काळी गणेश, थॉम्सन, प्लेम व तत्सम प्रकारच्या द्राक्षांचा यात समावेश असतो. गुजरात राज्यातील जनतेची जीवनप्रणाली समृद्ध असल्याने दर्जेदार वस्तूला मोल हे त्यांचे गणित आहे. त्यात व्यवहारप्रणाली पारदर्शी असल्याने द्राक्षाविक्रेत्याचा ओढा स्वाभाविकच गुजरातकडे असतो. डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत प्रतिदिन किमान वीस ट्रक द्राक्षे
गुजरात राज्यात विक्रीसाठी तालुक्यातून जातात.४दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष विक्र ीच्या माध्यमातून व गुजरातमधील आंबे खरेदीच्या माध्यमातून एकमेकांचे व्यवसाय भिन्न असले तरी या दोन्ही व्यवसायाच्या माध्यमातून व्यावसायिक संबंधात वृद्धी झाल्याचे जाणवते आहे. दरम्यान, द्राक्ष विक्र ीचे प्रमाण मोठ्या स्वरूपात असून, उलाढालही मोठी आहे. त्या तुलनेत आंब्याच्या खरेदीच्या माध्यमातून आर्थिक उलाढालीची तुलना त्या पातळीवर होत नसली तरी अर्थप्रणालीच्या प्रवाहाचा बदलता वेग या माध्यमातून होत असल्याने व्यावसायिक प्रणालीची गेल्या अनेक वर्षांपासूनची गती सातत्याने वाढताना दिसून येत आहे.