अंबड पोलीस ठाणे अधिकार्‍याविना!

By Admin | Updated: June 6, 2014 23:53 IST2014-06-05T23:50:04+5:302014-06-06T23:53:56+5:30

सिडको : अत्यंत संवेदनशील असलेल्या अंबड पोलीस ठाण्यात निरीक्षकाचा पदभार प्रभारी म्हणून दुसर्‍या अधिकार्‍यास देण्यात आला आहे.

Ambad police station without the officer! | अंबड पोलीस ठाणे अधिकार्‍याविना!

अंबड पोलीस ठाणे अधिकार्‍याविना!

 

सिडको : अत्यंत संवेदनशील असलेल्या अंबड पोलीस ठाण्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पदभार प्रभारी म्हणून दुसर्‍या अधिकार्‍यास देण्यात आला आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नेमणूक करणे गरजेचे असतानाही इंदिरानगरसारख्या कमी लोकसंख्या असलेल्या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस म्हणून अधिकार्‍याची त्वरित नेमणूक करण्यात आली आहे; परंतु अंबड पोलीस ठाण्यास मात्र अजूनही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
अंबड पोलीस ठाण्यात संपूर्ण सिडकोसह अश्विननगर, गोविंदनगर, खुटवडनगर, अंबड औद्योगिक वसाहत आदि मोठा परिसर आहे. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्‍या, घरफोड्या होण्याबरोबरच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सरदार पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती; परंतु काही दिवसांतच पाटील सुट्टीवर गेले आहेत. त्यांच्या जागी अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार हे प्रभारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पदभार सांभाळत होते. त्यांची नुकतीच इंदिरानगर येथील पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे; परंतु अंबड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची अजूनही नेमणूक करण्यात आलेली नसल्याने सध्या श्रीमनवार हेच प्रभारी म्हणून काम बघत आहेत.
अंबड पोलीस ठाणे हे अत्यंत संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळखले जात असून, या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Ambad police station without the officer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.