निसर्गरम्य वातावरणात भरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:13 IST2020-03-11T13:13:20+5:302020-03-11T13:13:42+5:30
पेठ : विद्यार्थी दशेनंतर घेतलेला अध्यापक महाविद्यालयात प्रवेश,त्यानंतर पत्करलेली शिक्षकाची नोकरी आणि कुटूंबव्यवस्थेत अडकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अध्यापक विद्यालयाला भेट देऊन आठवणी जाग्या केल्या.

निसर्गरम्य वातावरणात भरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा !
पेठ : विद्यार्थी दशेनंतर घेतलेला अध्यापक महाविद्यालयात प्रवेश,त्यानंतर पत्करलेली शिक्षकाची नोकरी आणि कुटूंबव्यवस्थेत अडकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अध्यापक विद्यालयाला भेट देऊन आठवणी जाग्या केल्या.
रत्नागिरी जिल्हयातील निसर्गरम्य अशा आबलोली येथील अध्यापक विद्यालयात सन १९९२ च्या बॅचमध्ये राज्यभरातून विद्यार्थी -विद्यार्थीनींनी प्रवेश घेतला. शिक्षकी पेशाला आवश्यक असणारी पदवी प्राप्त करून आपआपल्या जिल्ह्यात स्थायिक झालेले हे माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र झाले. पन्नाशीची उमर गाठली असतांनाही महाविद्यालयात दाखल होतांना सर्वच भूतकाळाच्या आठवणीत रममाण झाले. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत गावापासून कोसो दूर शिक्षण घेत सर्वच मित्र मैत्रिण नोकरी, व्यवसाय व शेती क्षेत्रात स्थिरावलेले यावेळी दिसून आले.
प्रा. भारत शिंदे,प्रा. नारायण माळवे या आपल्या त्या काळातल्या गुरूजनांना वंदन करून सर्व विद्याथ्र्यांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मित्रांनी अतिशय भावनिकतेला साद घालत आपला जीवनपट उलगडला. चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रभाकर गुरव यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महावस्त्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नानासाहेब सोनवणे , गणेश नार्वेकर ,शशिकांत अमृतकर,रमेश चव्हाण ,गुलाबराव पाटील,धनावडे ,दिपा बाईत,मनिषा सावंत, सुधिर उर्कार्डे, प्रमोद काजरोळकर,गोपाळ ढोरे,पल्लवी लेले,सरला पवार ,शशिकांत बागूल,स्वाती मोहित,गीता रेपाळ,अंजली आंग्रे,सुभाष मायंगडे,जयवंत सावंत यांचे सह शिक्षक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.शशिकांत बागूल यांनी सुत्रसंचलन तर दिनेश नेटके यांनी आभार मानले.