माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 15:57 IST2020-01-19T15:56:13+5:302020-01-19T15:57:47+5:30
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील सन २००५ - २००६ या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यानी सोशल मिडियाच्या माध्यमातून तब्बल चौदा वर्षांनंतर एकत्र येत मोठया उत्साहात ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणावर स्नेहसंमेलन साजरे केले.यात उच्च पदस्थ अधिकारी, खाजगी कंपनीत उच्च पदावर असलेले कर्मचारी, राजकीय क्षेत्रात व इतर क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थ्यांचा ब्रिटिशकालीन दारणा धरण येथील विश्रामगृहावर पुन्हा एकदा वर्ग भरला होता.

जनता विद्यालय अस्वली येथील ब्रिटिशकालीन दारणा धरणावर माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी उपस्थित शिक्षक बी.जे. बच्छाव, अंकुश काजळे, किरण राजभोज, व माजी विद्यार्थी
ठळक मुद्देशाळेमधील मधील वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून गप्पा मारल्या, सुख दु:खाच्या वाटेवर दिवंगत मिञांना भावनाविवश होत श्रद्धांजली अर्पण करत काही मित्रांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली.
.
. याप्रसंगी माजी शिक्षक बी.जे.बच्छाव, ए.डी.पवार, सोनाली काकळीज, स्वाती धोंगडे, इगतपुरी माजी पंचायत समितीच्या सदस्य वैशाली सहाणे, अर्चना धोंगडे, सिमा धोंगडे, सोनल उन्हवणे, संगिता नाडेकर, स्वाती महाले, सुजाता गाडे, संजीवनी दराडे, साधना गुळवे, पुनम शिरसाठ, सविता गायकर, गणेश काजळे, रावसाहेब झोमान, गणेश गुळवे, अशोक मुसळे, पंडीत गुळवे, दिपक दवते, आदी माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
--