पूर्व प्राथमिकसाठीही आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 21:52 IST2020-06-24T21:50:28+5:302020-06-24T21:52:21+5:30

नाशिक : देशभरातील शाळा, महाविद्यालये आॅगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. यात पूर्व प्राथमिक शाळाही मागे नसून नर्सरी सोबतच ज्युनिअर केजी व सीनिअर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे.

Also online for pre-primary | पूर्व प्राथमिकसाठीही आॅनलाइन

पूर्व प्राथमिकसाठीही आॅनलाइन

ठळक मुद्दे शिक्षणस्पर्धा : खासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टिकोन

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : देशभरातील शाळा, महाविद्यालये आॅगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. यात पूर्व प्राथमिक शाळाही मागे नसून नर्सरी सोबतच ज्युनिअर केजी व सीनिअर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे.
पूर्व प्राथमिक शाळांनी गेल्यावर्षी पालकांसोबत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप गु्रपच्या माध्यमातून झूम, गुगल मीटसारख्या अ‍ॅपच्या लिंग शेअर करून विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षांचे वर्ग आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारे आॅनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करीत शाळेपासून विद्यार्थी दूर होऊन दुसºया शाळेत प्रवेश घेऊन नये, यासाठी शाळांकडून व्यावसायिक दृष्टिकोन जपला जात आहे. पूर्व प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान अथवा कोणतीही मदत मिळत नाही. विद्यार्थ्यांसोबत मोबाइलच्या माध्यमातून संवाद साधत शाळेतील शिक्षक मागील वर्षात विद्यार्थ्यांना शिकविलेल्या अभ्यासक्रमासह विविध प्रकारच्या कार्यानुभवांच्या प्रात्यक्षिकांची उजळणीही करून घेत आहेत. त्यासाठी पालकांना पूर्वसूचना दिली जात असून, पालकांना विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यास सांगितले जात आहे.

Web Title: Also online for pre-primary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.