शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सुविधांचीही वानवा

By admin | Updated: March 11, 2015 00:03 IST

मूलभूत सुविधांचीही वानवा

इंदिरानगर : महापालिकेत गेल्या निवडणुकीत नव्याने झालेला प्रभाग म्हणजे प्रभाग ५४ होय. हा प्रभाग मनपाचा सर्वांत लहान प्रभाग म्हणून ओळखला जातो. सुमारे २८०० मतदारांचा हा प्रभाग आहे.प्रभाग ५४ मध्ये श्रद्धाविहार, श्रद्धा गार्डन, कलानगर, रंगरेज मळा, शिव कॉलनी, पांडवनगरी, सावित्रीबाई वसाहत, पिंगूळबागसह परिसर आहे. या प्रभागात सर्वांत जास्त झोपड्या विखरलेला मतदार आहे. यामुळे प्रभागात विकास झालाच नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.श्रद्धाविहार कॉलनी, पांडवनगरी, परिसरात गेल्या दहा वर्षांपासून अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही, तर काही भागांत अद्याप रस्त्यांचे साधे खडीकरणही झालेले नाही. तसेच कलानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अवेळी येणाऱ्या पाण्यामुळे महिलावर्गाची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी धूळखात पडून आहे.परिसरात बालगोपाळांसाठी उद्यान आणि क्रीडांगण नाही, तर श्रद्धाविहार कॉलनी व शिव कॉलनीसह काही भागांत असलेल्या मनपाच्या भूखंडांना संरक्षक भिंती बांधण्याचा सपाटाच लावला आहे, परंतु भूखंड विकसित न केल्याने हे भूखंड म्हणजे केरकचऱ्याचे माहेरघर बनले आहे.घंटागाडी नियमित येत नसल्याने श्रद्धा गार्डनमधील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक विहीर केरकचऱ्याने भरली आहे. हा केरकचरा कुजल्याने घाण व दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पांडवनगरी बसथांब्यापासून ते शिवकॉलनी, रंगरेज मळ्यासह परिसरातून गेलेल्या पावसाळी नाल्यात भूमिगत गटारीचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच स्वच्छता कर्मचारीअंतर्गत रस्त्यांवर फिरकत नसल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.