बदल्यांच्या आधीच राडा

By Admin | Updated: May 9, 2014 23:18 IST2014-05-09T23:14:17+5:302014-05-09T23:18:41+5:30

नाशिकला सभापतींनी टाकला प्रक्रियेवर बहिष्कार

Already Rada | बदल्यांच्या आधीच राडा

बदल्यांच्या आधीच राडा

नाशिकला सभापतींनी टाकला प्रक्रियेवर बहिष्कार
नाशिक : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांवरून लोकप्रतिनिधींच्या शिफारशींचा पाऊस प्रशासनावर पडत असतानाच, आता प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नवीन संघर्षही निर्माण होऊ लागला आहे. बदल्यांपूर्वीची कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडत असतानाच, प्रशासनाने माहिती दिली नाही म्हणून नाशिक तालुका पंचायत समितीचे सभापती अनिल ढिकले यांच्यासह पंचायत समितीच्या सदस्यांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार घातल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) घडली.
यासंदर्भात अनिल ढिकले यांनी प्रशासनाकडे याची तक्रारही केल्याचे कळते. नाशिक तालुका पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाची प्रक्रिया शासकीय कन्या शाळेतील गट समूह साधन केंद्राच्या इमारतीत सुरू आहे. यावेळी पंचायत समिती सभापती अनिल ढिकले, गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह पंचायत समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. नाशिक तालुक्यातून बाहेर जाणार्‍या बदलीपात्र शिक्षक व मुख्याध्यापकांची संख्या जास्त असल्याने बदलीपात्र शिक्षकांची यादी दुपारपर्यंत तयार नसल्याचे कळते. तसेच अन्य माहितीही वेळेवर तयार नसल्याचे पाहत पारा चढलेल्या सभापती व पंचायत समिती सदस्यांनी समुपदेशन प्रक्रियेवर बहिष्कार टाकत कन्या शाळा सोडली. सायंकाळी उशिरापर्यंत गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी मात्र बदलीसाठी आवश्यक ती प्रक्रिया राबविण्याचे काम सुरूच ठेवल्याचे कळते. (प्रतिनिधी)

माहितीच नसल्याने बहिष्कार
पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या बदलीपात्र कर्मचार्‍यांची माहितीच प्रशासनाकडे नसल्याने वेळेचा अपव्यय होत होता. त्यातच प्रशासनाला आवश्यक ती माहिती देता येत नसल्याने प्रक्रिया थांबविण्याशिवाय पर्यायच नसल्याने अखेरीस लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
- अनिल ढिकले, सभापती, पंचायत समिती, नाशिक
याद्यांमुळे अडचण
पंचायत समितीअंतर्गत येणारे ४५ पैकी २६ शिक्षक व २१ पैकी १४ मुख्याध्यापक तालुक्यातून बाहेर जाणार असल्याने त्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू होते. याद्या बनविण्यास विलंब झाल्याने प्रक्रियेस थोडा विलंब झाला. मात्र प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे. सभापतींना विनंती करून प्रक्रियेसाठी बोलावण्यात येईल.
- रवींद्रसिंह परदेशी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नाशिक

Web Title: Already Rada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.