पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचन प्रश्नही सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:10 PM2020-08-14T22:10:10+5:302020-08-15T00:24:03+5:30

वटार परिसरातील गावांसाठी जलदूत असलेली हत्ती नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बळीराजा सुखावला आहे. हत्ती नदीचे जलपूजन मच्ंिछद्र्र खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर खैरनार, हरिष खैरनार, चेतन गांगुर्डे, जगदीश खैरनार, प्रदीप खैरनार उपस्थितीत होते.

Along with drinking water, irrigation problem will also be solved | पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचन प्रश्नही सुटणार

वटार येथे हत्ती नदीचे जलपूजन करताना मच्छिंद्र खैरनार. समवेत हरिष खैरनार, शेखर खैरनार, चेतन गांगुर्डे, जगदीश खैरनार, प्रदीप खैरनार आदी.

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये समाधान : वटार येथे हत्ती नदीचे जलपूजन; खरिपाच्या आशा पल्लवित

वटार : परिसरातील गावांसाठी जलदूत असलेली हत्ती नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बळीराजा सुखावला आहे. हत्ती नदीचे जलपूजन मच्ंिछद्र्र खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर खैरनार, हरिष खैरनार, चेतन गांगुर्डे, जगदीश खैरनार, प्रदीप खैरनार उपस्थितीत होते.
प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने बळीराजा धास्तावला होता. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात मोठे हाल होत होते. जनावरांच्या चाºयाचे व पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल होत होते. शेतीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. पण गेल्या काही दिवसांपासून परिसरात पाऊस पडत असल्याने पठावा धरणाजवळील नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले व धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने हत्ती नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा प्रश्न सुटणार असन, खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळाची झळ सोसत असलेला बळीराजा यावर्षी शेतांत चांगले पीक येईन या आशेने आनंदाने भारावून गेला आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून परिसरात ऐन पावसाळ्यात पाऊस दडी मारत होता, शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचेही मोठे हाल होत होते. यावर्षी सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती; पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने परिसरात कधी जोरात तर कधी रिमझिम पाऊस पडत असल्याने परिसरातील शेतपिकाना जीवदान मिळाले आहे. खरिपाची शाश्वती नव्हती; पण आता रब्बीच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.
- मच्ंिछद्र खैरनार, शेतकरी, वटार

Web Title: Along with drinking water, irrigation problem will also be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.