परवानगी द्या अन्यथा दहा हजार रुपये मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:04 IST2020-06-09T22:42:32+5:302020-06-10T00:04:53+5:30
नाशिक : लॉकडाऊननंतर सलून आणि ब्यूटि पार्लरचा व्यवसाय ठप्प झाला आहे. गेल्या महिन्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केल्यानंतर अन्य व्यावसायिकांना परवानगी दिली जात असली तरी या व्यवसायिकांना मात्र मनाई आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा अन्य राज्यांच्या धर्तीवर दहा हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा सलून दुकानदार व पार्लर असोसिएशनने केली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर तसेच जिल्हा उपाध्यक्ष शंकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सूरज
मांढरे यांची भेट घेतली. यावेळी ही मागणी केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून सर्व सलून आणि ब्यूटिपार्लर बंद करण्यात आले आहेत. आता सर्व व्यवसाय पूर्ववत सुरू होत आहेत. त्यामुळे या व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा असताना
प्रत्यक्षात मात्र, हा व्यवसाय सोडून अन्य सर्व व्यावसायिकांना परवानगी
दिली जात आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प झाल्याने सलून व्यावसायिकांची उपासमार होत आहे. मात्र त्यानंतरदेखील जिल्हा प्रशासन व्यवसायाला परवानगी देत नसेल तर गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर सलून व्यावसायिकांना महिन्याला दहा हजार रुपये मानधन द्यावेत, अन्यथा कोणाचीही दाढी, कटिंग करणार नाही, असे संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिष्टमंडळात विलास निकम, मधुकर बोरसे, नाना वाघ, अनिल वाघ, अशोक ऐशी, सोमनाथ सोनवणे, विजय पंडित, अरुण सैंदाणे, अभय जाधव, यांच्यासह अन्य व्यवसायिकांचा समावेश होता.