नांदूरशिंगोटेत वृक्षांच्या रोपाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:00 IST2019-06-30T18:00:01+5:302019-06-30T18:00:45+5:30
नांदूरशिंगोटे : पावसाळ्यात केलेली वृक्ष लागवड हिताची ठरते या हेतूने येथील ग्रामस्थांना वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

नांदूरशिंगोटेत वृक्षांच्या रोपाचे वाटप
जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात व्यासपिठावर शिवसेना युवानेते उदय सांगळे, पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, अॅड. जयसिंह सांगळे, माजी सरपंच पी.डी. सानप, आनंदा शेळके, विनायक शेळके, भाऊपाटील शेळके, एन. एम. मंडलिक, शिवनाथ शेळके, प्रभाकर सानप, हरीभाऊ शेळके, सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच अनिल शेळके, सुर्यभान बर्के आदीसंह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामस्थांना रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तम बर्के, भारत दराडे, नानापाटील शेळके, संजय शेळके, भगवान शेळके, कैलास बर्के, मनोहर शेळके, गणेश घुले, मंगेश शेळके, दामोधर गर्जे, सोमनाथ शेळके, निवृत्ती शेळके, संतोष सानप, अनिल सांगळे, एकनाथ शेळके, रामनाथ नवले आदींसह विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.