शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 14:25 IST

सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मागास व गरजू विद्यार्थ्यांनाही शालेय दप्तर व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उधाण युवा ग्रुपतर्फे ‘एक दप्तर मोलाचे’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत  उधान ग्रूपने नाशिक - पालघर जिल्हयाच्या सिमेवरील अतिदुर्गम भागातील तोरंगण गावासह परिसरातील मेटकावरा व हेदपाडा येथील जिल्हापरिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व दप्तर, वह्या, पुस्तके, पेन आदी शालेय साहित्याचे वाटप केले. 

ठळक मुद्देआदिवासी विद्यार्थ्यांचे साठी एक दप्तर मोलाचेउधान युवा ग्रुपचा सामाजिक उपक्रम तोरंगण, मेटकावरा, हेदपाडा शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

नाशिक : सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मागास व गरजू विद्यार्थ्यांनाही शालेय दप्तर व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उधाण युवा ग्रुपतर्फे ‘एक दप्तर मोलाचे’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत  उधान ग्रूपने नाशिक - पालघर जिल्हयाच्या सिमेवरील अतिदुर्गम भागातील तोरंगण गावासह परिसरातील मेटकावरा व हेदपाडा येथील जिल्हापरिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व दप्तर, वह्या, पुस्तके, पेन आदी शालेय साहित्याचे वाटप केले. आदिवासी  आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मागील दोन महिन्यापासून उधाण युवा ग्रुपने ‘एक दप्तर मोलाचे’ या शिर्षकाखाली सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाचे नंतर एका चळवळीत रूपांतर झाले. या चळवळीला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, क्रीडा, शैक्षणिक, संगीत, आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनीही चित्रफीतीद्वारे नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करीत या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. सोशल मीडियावरही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. उधाण युवा ग्रुप अध्यक्ष जगदिश बोडके , तोरंगन गाव सरपंच माया जाधव, आरबी स्कूल चे संचालक भूषण सोनार, उपसरपंच प्रशांत बेंडकोळी, अशासकीय सदस्य आदिवासी उपयोजना समिती विनोद डेंगळे , सुवर्णा सांगळे, पूजा वाडेकर ,मिना बोरा,शाळेचे केंद्र ्रमुख्यधापक गोपाळ मैंद यांच्या उपस्थितीत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.  आदीवासी पाड्यातील व अतिदुर्गम भागातील गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहन देण्यासाठी उधानग्रूपने लोकसहभागातून ही चळवळ उभी केली असून आगामी काळात आदिवासांच्या शिक्षणासाठी ही चळवळ आणखी व्यापक करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे उधाण युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके यांनी सांगितले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळाSocialसामाजिक