चंद्रपूरला शालेय साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 17:37 IST2019-06-27T17:37:11+5:302019-06-27T17:37:27+5:30

सिन्नर : तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

Allotment of school literature to Chandrapur | चंद्रपूरला शालेय साहित्याचे वाटप

चंद्रपूरला शालेय साहित्याचे वाटप

सिन्नर : तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
आघ क्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेडचे कार्यकर्ते संदिप गवारी यांनी सदरचा उपक्रम राबविला. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. माजी नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, खोडरबर, पट्टी, शोपनर, पेन आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. लक्ष्मण तळपे व सिताराम मदगे, दत्ता वायचळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच प्रकाश मदगे, बाळु गवारी, लहानु म्हसाळ, समाधान शेखरे, काशिनाथ तळपे, मिलिंद गांगुर्डे, पोपट गांगुर्डे आदींसह प्राथमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Allotment of school literature to Chandrapur