आनंदवलीतील आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप

By Admin | Updated: October 3, 2016 23:34 IST2016-10-03T00:17:39+5:302016-10-03T23:34:08+5:30

आनंदवलीतील आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप

Allotment of relief to victims of pleasure | आनंदवलीतील आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप

आनंदवलीतील आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप

सिडको : यंदाच्या वर्षी मुसळधार पाऊस झाल्याने नदीलगत राहणाऱ्या नागरिकांसह काही भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे सर्व संसारोपयोगी साहित्य पावसाच्या पाण्यात वाहून गेले. यातील आनंदवली व शिंदे चाळ येथील पूरग्रस्तांना आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते नुकतेच शासकीय मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरल्याने संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने त्यांना बेघर व्हावे लागले. शासनाने आर्थिक मदत द्यावी याबाबत राजकीय पुढाऱ्यांबरोबरच नुकसानग्रस्तांकडून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाच्या वतीने पुरात संपूर्ण नुकसान झालेल्या भागाची पाहणी करयात आली. यातील आनंदवली व शिंदे चाळ परिसरातील पूरग्रस्तांना आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते शासकीय धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी सिमा हिरे म्हणाल्या की, सरकारच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून, त्याचा गरीबांना लाभ मिळत आहे. याप्रसंगी महेश हिरे, मुकुंद येवलेकर, रमेश पवार, अशोक पवार, कांबळे, गायकवाड आदिंसह पुरात नुकसान झालेले नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Allotment of relief to victims of pleasure