कळवणला ३६ कुटुंबांना धान्य, किराणाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:07 IST2020-03-30T16:59:37+5:302020-03-30T17:07:01+5:30
कळवण : येथील देवळा रोडवरील विसावा पेट्रोल पंपासमोरील जडीबुटी विक्र ेते, मदारी व गारु डी अशा सुमारे ३६ कुटुंबांना गहू, तांदूळ, बिस्कीट, भाजीपाला, टरबूज, हिरव्या मिरच्या व आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कळवणला ३६ कुटुंबांना धान्य, किराणाचे वाटप
कळवण : येथील देवळा रोडवरील विसावा पेट्रोल पंपासमोरील जडीबुटी विक्र ेते, मदारी व गारु डी अशा सुमारे ३६ कुटुंबांना गहू, तांदूळ, बिस्कीट, भाजीपाला, टरबूज, हिरव्या मिरच्या व आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार, विकास देशमुख, गोविंद कोठावदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या तालुका, जिल्हा नेते व कार्यकर्ते यांनी हा उपक्र म राबविला.
आपला व्यवसाय सांभाळून उदारनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांजवळ शिधा पत्रिका नसल्याने सदर व्यक्तींनी रेशन पुरविण्याची मागणी भाजपने तहसीलदार बी. ए. कापसे यांची भेट घेऊन केली. यावेळी शिष्टमंडळाला रेशन पाठविण्याचे आश्वासन महसूल यंत्रणेने दिले. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी भाजप शहराध्यक्ष निंबा पगार, हेमंत रावले, चेतन निकम, मोहसीन कासार, उमेश पगार, दीपक वेढणे, एस. के. पगार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.