भाजीबाजारात कापडी पिशव्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:20 IST2018-04-05T00:20:24+5:302018-04-05T00:20:24+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पाथर्डी फाटा येथील भाजीबाजारात कापडी पिशव्या वाटून प्लॅस्टिकबंदीला पाठिंबा दिला आहे. नागरिकांचे प्रबोधन करून प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या हानीची माहिती देणाºया पत्रकांचे वाटप करण्यात आले.

Allotment of cloth bags in vegetable market | भाजीबाजारात कापडी पिशव्यांचे वाटप

भाजीबाजारात कापडी पिशव्यांचे वाटप

सिडको : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पाथर्डी फाटा येथील भाजीबाजारात कापडी पिशव्या वाटून प्लॅस्टिकबंदीला पाठिंबा दिला आहे. नागरिकांचे प्रबोधन करून प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या हानीची माहिती देणाºया पत्रकांचे वाटप करण्यात आले. युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वैभव देवरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्र म राबवण्यात आला. भाजीबाजारात खरेदीसाठी येणाºया ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या नाकारून इतर पर्यायांचा विचार करण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित ग्राहकांना सुमारे पाचशे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पवननगर, शिवाजी चौक आणि राणेनगर येथील भाजीबाजारातदेखील कापडी पिशव्या वाटण्यात आल्या. यावेळी युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आर. बी. गामणे, अजय पाटील, अंकुश भोर, मिलिंद भामरे, राजू उशीर, निखिल पवार, राजाभाऊ सोनवणे, योगेश शेवाळे, शालिग्राम पाटील, उमेश चौधरी, यश सुपारे आदींसह युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Allotment of cloth bags in vegetable market