शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पोलिसांकडून जप्त केलेल्या २२ लाख ९१ हजाराच्या मुद्दमालाचे फिर्यांदींना केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 15:41 IST

 नाशिक पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा एक व दोन व मध्यवर्ती युनीटचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ३० )  संबधित फिर्यादी/तक्रारदारांना वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देपोलिसांनी केला होता २२ लाख ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ८ फिर्यादींच्या मिळाले त्यांचे ६ लाख ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने परतचोरी गेलेल्या वस्तु परत मिळाल्याने नाशिककरांनी मानले पोलिसांचे आभार

नाशिक :   पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा एक व दोन व मध्यवर्ती युनीटचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ३० )  संबधित फिर्यादी/तक्रारदारांना वाटप करण्यात आले.पोलीसांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या कारवायांमध्ये तब्बल २२ लाख ९१ हजार  २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगेत केला होता. यात ८ फिर्यादींच्या ६ लाख ६१ हजार रुपयांच्या सोन्यांच्या दागिन्यांसह जवळपास १५ लाख २५ हजार रुपये किंमचीच्या २३ मोटार सायकल ६ फिर्यादींचे जवळपास ६८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन , तसेच इतर चोरीच्या घटनांमधील चोरीची रक्कम २० हजार दोनशे रुपये असा एकू ण २२ लाख ९१ हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी संबधित प्रकरणारीत फिर्यादी यांना  वाटप केला आहे. पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेल्या मुद्दमेमालाचे वाटप करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसानी दिले  होते. त्यानुसार गुरुवारी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात झालेल्या पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते संबंधित प्रकरणातील फियार्दींना वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त  पौर्णिमा चौगुले,  अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे,  सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील  आदि उपस्थित होते. दरम्यान, विविध प्रकरणातील फिर्यादींनी त्यांचा मुद्देमाल त्यांना परत मिळाल्याने समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय