विद्यार्थ्यांना १२१ सायकलींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:26 IST2020-02-02T22:27:41+5:302020-02-03T00:26:37+5:30
इंडियन आॅइल कंपनीने साडेचार लाख रुपये किमतीच्या १२१ सायकली नामपूर-येथील उन्नती-संस्थेच्या अलई माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

नामपूर येथे सायकल वितरणप्रसंगी अक्षय धांडे, मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर, अरु ण खुटाडे, नितीन नेर, कविता सावंत, करु णा अलई, सीमा बधान आदी.
नामपूर : इंडियन आॅइल कंपनीने साडेचार लाख रुपये किमतीच्या १२१ सायकली नामपूर-येथील उन्नती-संस्थेच्या अलई माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. दरम्यान, नामपूर इंग्लिश स्कूल, रातीर, द्याने, जिल्हा परिषद शाळा आदी शाळांतून १३०० सायकलींचे वाटप करण्यात आले. नामपूर हायस्कूलमध्ये राघोनाना अहिरे व डॉ. प्रशांत सोनवणे यांनी या दुचाकींचे वाटप केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर व कंपनीचे अधिकारी अक्षय धांडे यांनी पर्यावरण संतुलन व व्यायामासाठी या सायकलींचा वापर करण्याचे आवाहन केले.