शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेश माहिती पुस्तिकांचे शाळांना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:56 IST

शिक्षण विभागाकडून 2018-19 शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती असलेल्या माहिती पुस्तिकांचे शुक्रवारपासून शहरातील विविध शाळांना (दि.4) वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील सर्व शाळांना प्रवेश प्रक्रियेच्या सर्व माहिती पुस्तिकांचे वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 10 मे पासून माहिती पुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे

ठळक मुद्देअकरावी प्रवेश पुस्तिकांचे शाळांना वाटप 10 मेपासून विद्यार्थ्यांना विक्री करता येणार शाळांना विद्यार्थी पालक सभा घेण्याच्या सूचना

नाशिक : शिक्षण विभागाकडून 2018-19 शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती असलेल्या माहिती पुस्तिकांचे शुक्रवारपासून शहरातील विविध शाळांना (दि.4) वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील सर्व शाळांना प्रवेश प्रक्रियेच्या सर्व माहिती पुस्तिकांचे वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 10 मे पासून माहिती पुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे.शिक्षण उपसंचालक कार्यालयांकडून शहरातील शाळांना पुस्तीका मिळाल्या असल्या तरी या माहीती पुस्तिकांची विद्यार्थ्यांना विक्री करण्यापूर्वी संबधित शाळांनी विद्यार्थी, पालक व शिक्षक सभा घेऊन विद्याथ्र्याना प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करणे अनिवार्य करण्यात आले आले. अशाप्रकारे सभेतून विद्यार्थी व पालकांना संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती दिल्यानंतर संबधित शाळांना सभेचा इतिवृत्त अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करावी लागणार आहे. तयानंतरच माहिती पुस्तकांची विक्री करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व शाळांकडून 10 मे पूर्वी अशाप्रकारे विद्यार्थी, पालक व शिक्षक सभा घेऊन त्यानंतरच माहिती पुस्तिकांची विक्री करण्यात येणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची नियमावली, प्रवेश फे ऱ्या, मार्गदर्शन केंद्र अशी सर्व माहिती माहिती पुस्तिकेत उपलब्ध आहे. यावर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी शहरातील 57 महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यात 27 हजार 500 जागा उपलब्ध आहेत. शहरात यावर्षी तीन नवीन कॉलेज सुरू झाले नवीन महाविद्यालयांमधील व वाढीव तुकडय़ांच्या माध्यमातून विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा वाढणार आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञान शाखेसाठी वाढीव तुकडय़ा घेतल्या असल्याने विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी वाढीव जागा उपलब्ध होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेंतर्गत विविध शाळांना शुक्रवारपासून माहिती पुस्तिकांचे वाटप सुरु झाले आहे. माध्यमिक शाळांनी त्यांच्या पटसंख्येनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 10 मे पासून माहिती पुस्तिकांची विक्री करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेकडून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यानुसारच शाळांना माहिती पुस्तकारचे वितरण करण्यात आले आहे. सीबीएसई व आयसीएसई सारख्या अन्य मंडळाच्या शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका उपलब्ध करून द्यावयाच्या असतील तर त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी