पिंपळगाव बसवंत परिसरातील आंगनवाडीत पोषण आहार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 17:37 IST2019-06-20T17:36:51+5:302019-06-20T17:37:07+5:30
पिंपळगाव बसवंत : शासनाकडून तीन वर्षाच्या आतील बालक तसेच गरोदर माता यांना गहु,मुगदाळ,चवळी,मटकि,मसुरदाळ, तेल,तिखट,हळद,मिठ आदि वस्तुंचे पाकिट पोषण आहाराचा पुरवठा या वर्षी पासुनसुरू केला आहे.

पिंपळगाव बसवंत परिसरातील आंगनवाडीत पोषण आहार वाटप
पिंपळगाव बसवंत : शासनाकडून तीन वर्षाच्या आतील बालक तसेच गरोदर माता यांना गहु,मुगदाळ,चवळी,मटकि,मसुरदाळ, तेल,तिखट,हळद,मिठ आदि वस्तुंचे पाकिट पोषण आहाराचा पुरवठा या वर्षी पासुनसुरू केला आहे. पिंपळगाव बसवंत शहरातील ३४ आंगणवाडीत या पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे. लहान बालकांना पोषण आहारासाठी त्या बालकाचे आधार कार्ड आवश्यक आहे .बहुतेक पालकांनी अद्यापही बालकांचे आधार कार्ड काढले नसल्याने व पोषण आहार घेतांना आधार कार्ड सक्तीचे केल्याने आधार कार्ड काढण्यासाठी गर्दी केली. पिंपळगाव बसवंत शहराचा व परीसराचा विस्तार बघता एकाच ठिकाणी आधार कार्ड काडले जात असल्याने सकाळी सात वाजल्यापासून महिला लहान बालकांना सेतु कार्यालयासमोर घेऊन बसत असल्याने महिलांचे हाल होत आहे. एका दिवसाला तीस ते पस्तीस आधार कार्ड तयार होत असल्याने महिला चार ते पाच तास बालकांना घेऊन बसावे लागते. शहरात अजुन आधार कार्ड ची सुविधा होणे गरजेचे आहे.पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतने तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करूनही आधार कार्ड काढण्याचे नवीन केंद्र मिळु शकत नसल्याने हाल होत आहे.अांगणवाडीत पोषण आहार वाटप सुरू केल्याने आधार कार्ड साठी पालकांची मात्र चांगलिच दमछाक होतांना दिसून येते.