कळवण न्यायालयात मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:31 IST2020-04-08T23:31:01+5:302020-04-08T23:31:50+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

Allocation of masks, sanitizer in the court of justice | कळवण न्यायालयात मास्क, सॅनिटायझरचे वाटप

तुषार शिंदे यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करताना समता परिषद तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल व न्यायधीश एस. एस. पारखी व कर्मचारी.

कळवण : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
तालुक्यातील अनेक नागरिक कळवण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात येत असतात. त्यामुळे न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. ही बाब ओळखून समता परिषद कळवण तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल यांनी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून दिल्याने न्या. एस. एस. पारखी यांच्या प्रमुख उपस्थित कर्मचाºयांना वापट करण्यात आले. यावेळी संजय पवार, धनंजय पाटील, तुषार शिंदे, प्रवीण गांगुर्डे, कैलास पाटील, प्रकाश आहेर, प्रफुल्ल बागुल, नंदू जाधव उपस्थित होते.

Web Title: Allocation of masks, sanitizer in the court of justice