पंचायत समितीतर्फे ‘घरघंटी’चे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 23:06 IST2019-03-07T23:05:28+5:302019-03-07T23:06:09+5:30
विंचूर : येथे विंचूर बीटमधील अंगणवाडीतील मुलांचा कलागुणदर्शन कार्यक्र म नुकताच संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीमार्फत महिला व बालविकास योजनेअंतर्गत ११ लाभार्थ्यांना घरघंटीचे वाटप करण्यात आले.

विंचूर येथे महिलांना घरघंटीचे वाटपप्रसंगी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, अभिमान माने, मुंडे, संदीप कराड आदी.
विंचूर : येथे विंचूर बीटमधील अंगणवाडीतील मुलांचा कलागुणदर्शन कार्यक्र म नुकताच संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीमार्फत महिला व बालविकास योजनेअंतर्गत ११ लाभार्थ्यांना घरघंटीचे वाटप करण्यात आले.
बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुंडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, बालविकास प्रकल्प अधिकारी मोहन तुपे, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, शिवा सुरासे, सरपंच ताराबाई क्षीरसागर, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कैलास सोनवणे, ग्रामपालिका सदस्य अविनाश दुसाने आदी उपस्थित होते.
यावेळी प्रज्ञा रूपवते, मंगला नारायणे, गायत्री नारायणे, शुभांगी निकाळे, अंजना वाघ, प्रणाली रणखंबे, वनिता गांगुर्डे, छाया पवार, श्रीमती मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे आयोजन पर्यवेक्षक खांदवे व सर्वसेविका मदतनीस यांनी केले होते.