युरिया खताचा काळाबाजार होत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:51 IST2020-07-25T23:33:06+5:302020-07-25T23:51:04+5:30
नाशिक : शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यांना पाहिजे त्या प्रमाणात युरिया खत उपलब्ध होत नसल्याने खुल्या बाजारात युरियाचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत, याला अटकाव करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी दिला आहे.

युरिया खताचा काळाबाजार होत असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यांना पाहिजे त्या प्रमाणात युरिया खत उपलब्ध होत नसल्याने खुल्या बाजारात युरियाचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत, याला अटकाव करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी दिला आहे.
आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, शेतकºयांना यांना युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. तालुकास्तरावर युरिया उपलब्ध नसल्याच्या प्रामुख्याने तक्रारी आहेत.
खतविक्रेते युरियाची साठेबाजी करून जादा दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या भरडला जात आहे. एकीकडे शेतमालास भाव नाही, तर दुसरीकडे युरिया मिळत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी संकटात सापडला आहे. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, सदगीर उपस्थित होते.