शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नाशिकच्या मनसेत नाही ऑल इज वेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 22:14 IST

नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने उभारी घेण्याची तयारी गेल्या वर्षी सुरू असतानाच अचानक सुरू झालेले फेरबदल अनेकांना आश्चर्य चकीत करणारे ठरत आहेत. विशेषत: मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात नाशिकमध्ये खूप काही घडले नाही. मात्र एकापाठोपाठ असे दोन संघटनात्मक बदल झाल्याने पक्षात यानिमित्ताने ‘ऑल इज नॉट वेल’ची प्रचीती आली आहे. इतकेच नव्हे तर दोन छाेटे बदल झाल्यानंतर आता पुढील विकेट कोणाची पडणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.  

ठळक मुद्देफेरबदलांमुळे चर्चाअनेकांना अर्धचंद्र मिळणार

नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने उभारी घेण्याची तयारी गेल्या वर्षी सुरू असतानाच अचानक सुरू झालेले फेरबदल अनेकांना आश्चर्य चकीत करणारे ठरत आहेत. विशेषत: मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात नाशिकमध्ये खूप काही घडले नाही. मात्र एकापाठोपाठ असे दोन संघटनात्मक बदल झाल्याने पक्षात यानिमित्ताने ‘ऑल इज नॉट वेल’ची प्रचीती आली आहे. इतकेच नव्हे तर दोन छाेटे बदल झाल्यानंतर आता पुढील विकेट कोणाची पडणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.  

राज्यात एकमेव सत्ता मिळालेल्या गेलेल्या नाशिक महापालिकेतील सत्ता गमविल्यानंतर आता पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरे उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. नाशिक महापालिकेची अवघ्या दहा महिन्यांनी निवडणूक होणार आहे. त्यामुळे अन्य  राजकीय पक्षांबरोबर मनसेने अंग झटकून कामाला सुरूवात केली असली तरी या पक्षाची संघटनात्मक कामाची तयारी तशी नाही, उलट एकमेकांच्या कुरघोड्या आणि त्यातून हेाणारे फेरबदल हा चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरी पक्षातील तरूण तुर्कांनी काही ज्येष्ठांच्या मक्तेदारी विषयी तक्रारी केल्यानंतर तरी राज यांच्या नाशिक दौऱ्यात काही तरी मोठा संदेश दिला जाईल अशी अपेक्षा हेाती. परंतू निवडक पदाधिकाऱ्यांची एक औपचारीक बैठक सोडली तर गर्दी करणाऱ्यांच्या हाती फार काही लागले नाही.

राजदूत घडवण्याची नवी संकल्पना राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात मांडली. त्यानंतर दोन पदाधिकारी नाशिकमध्ये येऊन राजदूत संकल्पनेविषयी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले गेले. परंतु पुढे काहीच झाले नाही. उलट त्यानंतर सचिन भोसले आणि संदीप भंवर यांची पदे काढून घेतल्याने नवीन काहीच नाही उलट जुन्यातच फेरबदल सुरू झाल्याचे दिसले. अर्थात हे फेरबदल दिसायला फार महत्वाचे वाटत नसले तरी बदल झाल्यानंतर चर्चा तर होणारच...! आता आणखी काही एक दोन नंबर लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरवर शांत वाटत असले तरी मनसेत अंतर्गत खदखद कायम असल्याचे सांगितले जात आहे.

पक्षातील गटबाजी हे पक्षाचे जिवंतपणाचे लक्षण असल्याचे नेहेमीच काही ज्येष्ठ नेते बोलून गेले आहेत. मात्र असा जिवंतपणा विरोधी पक्षांना नामोहरम करण्यापेक्षा स्वपक्षीयांच्या विरोधात असेल तर फार काही वावगे हेाणार नाही. पक्षात सध्या देान नेत्यांचे उघड गट असून बहुतांश पदाधिकाऱ्यांची त्यात विभागणी झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तटस्थतेला तर वावच नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणूकीत ही गटबाजी मेाडीत काढण्याचे खरे आव्हान पक्षासमोर आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे