शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅक बनला मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:08 IST

हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलजवळ पाण्याच्या पाटालगत मनपा प्रशासने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर पुन्हा मद्यपींचा सुळसुळाट वाढला आहे.

पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलजवळ पाण्याच्या पाटालगत मनपा प्रशासने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर पुन्हा मद्यपींचा सुळसुळाट वाढला आहे. जॉगिंग ट्रॅकवर सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सकाळी पडलेल्या मद्याच्या बाटल्या व शेव-चिवड्याचे दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे ट्रॅकवर सकाळी फिरण्यासाठी येणाºया जॉगर्सने तीव्र नाराजी व्यक्त करत मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.मनपाने पाटालगत जॉगिंग ट्रॅक तयार केला असून, अंदाजे एक किमी लांब असलेल्या ट्रॅकवर परिसरातील मुले, मुली, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक दैनंदिन सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येतात. सकाळी ट्रॅकवरून फिरताना ट्रॅकवर मध्यभागी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या, शेव-चिवडा, सिगारेटची पाकिटे यांचे दर्शन घ्यावे लागते. परिसरातील काही मद्यपी टोळके रात्रीच्या सुमाराला ट्रॅकवर ठाण मांडून मद्य प्राशन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जॉगिंग ट्रॅक झाल्याने त्याचा नागरिकांना फायदा झाला खरा, मात्र सध्या ट्रॅकवर परिसरात राहणाºया टवाळखोर व मद्यपींची वक्रदृष्टी पडल्याचे दिसून येते. ट्रॅकच्या बाजूला रोज मद्याच्या बाटल्या, ग्लास फेकल्याचे आढळून येते. मनपा प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार केला असला तरी, त्याचा रात्रीच्या वेळी होणारा गैरवापर रोखण्याची कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे आता मद्यपींवर पंचवटी पोलिसांकडून वेळीच कठोर कारवाईची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.दुखापत होण्याची शक्यतामहापालिका प्रशासनाने ट्रॅक तयार केलेला असला तरी अद्याप विद्युत व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना अंधारातच ये-जा करावी लागते. त्यातच मद्यपी रिकाम्या बाटल्या ट्रॅकवर फेकत असल्याने नागरिकांच्या पायाला लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर विद्युत व्यवस्था करावी.- अर्जुन टाकळकर, ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस