अर्धनग्न तरुणींसह मद्यधुंदांचा धिंगाणा

By Admin | Updated: March 29, 2017 01:20 IST2017-03-29T01:20:13+5:302017-03-29T01:20:36+5:30

घोटी : इगतपुरी शहरानजीक तळेगाव शिवारात एका प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या बॅचलर पार्टीवर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकून तेरा जणांना अटक केली आहे.

Alcohol abuse with half-young girls | अर्धनग्न तरुणींसह मद्यधुंदांचा धिंगाणा

अर्धनग्न तरुणींसह मद्यधुंदांचा धिंगाणा

खळबळ : इगतपुरीनजीक बॅचलर पार्टीवर धाड
घोटी : इगतपुरी शहरानजीक तळेगाव शिवारात मुंबई - आग्रा महामार्गावरील एका प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या बॅचलर पार्टीवर इगतपुरी पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकून चार युवतींसह तेरा जणांना अटक केली आहे. यात उच्चभ्रू व प्रतिष्ठित कुटुंबातील सुशिक्षित तरुणांचा सहभाग असल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी मोठ्या रोख रकमेसह मद्याच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात नागपूर, पिंपरी चिंचवड, ठाणे, औरंगाबाद व नंदुरबार येथील काही अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश असून, त्यांना वगळल्याची चर्चा होत असल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. मुंबई - आग्रा महामार्गावरील मिस्टिक व्हॅली या प्रतिष्ठित हॉटेलच्या परिसरातील बंगला क्र. ११ मध्ये काही तरुण-तरुणी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकावर गोंधळ घालत असल्याची माहिती मुंबई येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने इगतपुरी पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलीस तेथे गेले असता बंगल्यामध्ये मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकावर मद्यधुंद अवस्थेत काही तरु णी तोकड्या कपड्यात अश्लील हावभाव करून घुंगरू बांधून नाचत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा प्रकार थांबवून तेरा जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून पोलिसांनी ५७ हजार रु पये रोख जप्त केले. तसेच दहा रुपये मूल्याच्या ३२३ नकली नोटा, मारु ती इर्टिगा (एमएच ०२ सीआर ४३६६), लॅपटॉप, २ स्पीकर, एक अ‍ॅम्प्लिफायर, तीन ब्लॅक लेबलच्या ७५० मि.लि.च्या सीलबंद दारूच्या बाटल्या, एक अप्सुलेट वोडका बाटली असा ऐवज जप्त केला आहे. या प्रकारामुळे इगतपुरीसह जिल्ह्यात चर्चा सुरू असून, इगतपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश वराडे यांच्या फिर्यादीनुसार भादंवि २९४ (अश्लीलकृत्य करणे), मुंबई पोलीस कायदा कलम ११२/११७ (सार्वजनिक शांततेचा भंग) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ११ जणांना पोलीसांकडून तर वाहनचालक व साऊंड सिस्टीम चालकास न्यायालयात उभे केले असता जामीन देण्यात आला आहे.  दरम्यान, पोलिसांनी नऊ तरूण व चार तरूणींंना या प्रकरणात अटक केल्याचे दाखविले असले तरी प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा अधिक असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. धिंगाणा घालणाऱ्यांमध्ये काही प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलांचाही समावेश असून त्यात नंदुरबार, नागपूर व औरंगाबाद येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या तसेच ठाणे येथील एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी मुंबई येथे आॅनलाइन बुकींग करून व लाखो रूपये मोजून बारबाला आणल्याचेही बोलले जात आहे. मात्र यासंदर्भात पोलीस तक्रारीत उल्लेख करण्यात आलेला नाही. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकारी वर्गाकडून व राजकीय दबावातून काही बड्या हस्तींच्या मुलांना यातून वगळण्यात आल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. यामुळेच स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे.
ैअवैध व्यवसायाच्या तक्र्रारी
मुंबई-ठाण्यापासून अवघ्या दीड ते दोन तासाच्या अंतरावर असलेला इगतपुरी परिसर दऱ्या-खोऱ्यांनी व निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने येथे मुंबईतील धनिकांनी फार्म हाऊस घेऊन ठेवलेले आहेत. याच परिसरात अनेक लहान-मोठी हॉटेल्सही आहेत. याठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असतात, अशा स्थानिकांच्या तक्रारी आहेत. परंतु त्याकडे पोलीस विभागाकडून सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे.
लैला खानची आठवण ताजी
सदरची घटना ज्या हॉटेल परिसरात घडली त्याच्याच पाठीमागील बाजूस पाच वर्षापूर्वी प्रख्यात अभिनेत्री लैला खान हिने फार्म हाऊस उभारल्याची व त्यातच तिची हत्त्या झाल्याची घटना घडली होती. बॅचलर पार्टीमुळे या हत्त्या प्रकणाचीही आठवण ताजी झाली असून, हा परिसरा व येथे उभे राहिलेले फार्म हाऊसेस पुन्हा चर्चेत आले आहेत.
इगतपुरी येथे रविवारी मिस्टिक व्हॅली येथे टाकलेल्या धाडीत तेरा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यात कोणीही आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची मुले नाहीत. - किशोर नवले, पोलीस निरीक्षक,  स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण
पोलिसांची भूमिका संशयास्पद
बॅचलर पार्टी रविवारी (दि. २६) पार पडली व त्याच रात्री कारवाई केली गेली असताना या प्रकरणाची दोन दिवस गुप्तता का पाळण्यात आली, याबाबत शंका घेतली जात आहे. स्थानिक पोलिसांपासून जिल्हास्तरीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही यासंदर्भात अधिकृतपणे माहिती देण्यासाठी पुढे आले नाही.
अंमली पदार्थ सापडल्याचीही चर्चा असून, पोलिसांकडून जप्त केलेल्या वस्तू कमी प्रमाणात दाखविल्या गेल्याची चर्चाही सुरू आहे. अटक केलेल्यांवर अंमली पदार्थ विरोधी कलम तसेच वेश्या व्यवसायाबाबतची कलमे न लावता केवळ किरकोळ कलमे लावून संशयिताना पाठीशी घालण्याचा प्रकार होत नाही ना? अशीही शंका घेण्यात येऊन पोलिसांच्या भूमिके विषयी संशय व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांचे नातेवाईक? पार्टीत सहभागी तरुणांमध्ये केवळ नऊच जणांवर गुन्हा दाखल झाला असून, राजकीय दबावापोटी अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची नावे वगळण्यात आल्याची चर्चा आहे. यात नागपूर, औरंगाबाद, ठाणे व नंदुरबार येथील काही अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
बनावट नोटा
पार्टीत मद्यधुंद अवस्थेत काही अर्धनग्न तरु णी अश्लील हावभाव करून घुंगरू बांधून नाचत होत्या. बड्या बापाची तरु ण पोरं त्यांच्यावर पैसे उधळत होते. विशेष म्हणजे उधळण्यात येणाऱ्या नोटांत दहा रु पयांच्या बनावट नोटाही होत्या.

 

Web Title: Alcohol abuse with half-young girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.