अलंगुण ग्रामस्थांची आगग्रस्त कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:32 IST2020-08-06T22:35:11+5:302020-08-07T00:32:57+5:30
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील पांडुरंग महाले यांच्या घराला मागील महिन्यात आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. महाले कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी महाले कुटुंबीयांना मदतीचा हात देत सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यात आली.

अलंगुण ग्रामस्थांची आगग्रस्त कुटुंबीयांना मदत
ठळक मुद्दे एक लाख पंचवीस हजार रुपयांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील पांडुरंग महाले यांच्या घराला मागील महिन्यात आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. महाले कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी महाले कुटुंबीयांना मदतीचा हात देत सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यात आली.
यावेळी माजी आमदार जे. पी. गावीत, पं. स. उपसभापती इंद्रजित गावीत, वसंत बागुल, आनंदा गावीत, पांडुरंग भोये, सरपंच हेमंती भोये, उपसरपंच गोपाळ चौधरी, शिवराम भोये, पांडुरंग महाले, यशवंत गावीत आदी उपस्थित होते.