सिन्नर बसस्थानकात अकोलेच्या प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 14:42 IST2019-11-06T14:41:41+5:302019-11-06T14:42:22+5:30
सिन्नर : येथील बसस्थानकात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वृध्दाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. सामनगाव-एकलहरे येथील रहिवासी बाजीराव ...

सिन्नर बसस्थानकात अकोलेच्या प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू
सिन्नर : येथील बसस्थानकात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वृध्दाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. सामनगाव-एकलहरे येथील रहिवासी बाजीराव कचरू गायकवाड ( ७०) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (दि. ५) रोजी दुपारी सिन्नरच्या बसस्थानकात हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.ते बसने मूळ गावी देवठाण (ता. अकोले) येथे जात होते. सिन्नर येथे उतरून मोबाईलवर बोलत असताना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सिन्नर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, हवालदार शहाजी शिंदे तपास करीत आहेत.