घोटीजवळ अपघातात अकोलेचा एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:40 IST2018-08-25T14:39:52+5:302018-08-25T14:40:10+5:30
घोटी : घोटी सिन्नर चौफुली येथे भिवंडी आगारच्या बसने घोटी शहरातून महामार्गावर आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला.

घोटीजवळ अपघातात अकोलेचा एक ठार
घोटी : घोटी सिन्नर चौफुली येथे भिवंडी आगारच्या बसने घोटी शहरातून महामार्गावर आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. भिवंडी आगाराची बस एम.एच.२०,बी.एल. ३३२१ ही त्र्यंबकेश्वरहुन ठाण्याकडे जात असताना घोटी शहराजवळ सिन्नर चौफुली येथे या बसने घोटी वरून अकोलेकडे जाणाऱ्या दुचाकी क्र मांक एम.एच.१७,बी.एफ. २६७८ ला जोरात धडक दिली. या अपघातात किसन आबा कोकतरे (४५) रा.अकोले हा जागीच ठार झाला.तर एक जण गंभीर जखमी झाला. दरम्यान अपघाताची माहिती समजताच घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह उपनिरीक्षक ढुमसे आदींनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमीला उपचारार्थ घोटीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले.याबाबत घोटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.