अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:17 IST2021-01-25T19:14:56+5:302021-01-26T02:17:07+5:30
वेळुंजे : अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पुत्रदा एकदशीच्या मुहूर्तावर प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम घेऊन सदस्यांना पद नियुक्त करण्यात आले.

अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर
वेळुंजे : अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पुत्रदा एकदशीच्या मुहूर्तावर प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम घेऊन सदस्यांना पद नियुक्त करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर पाटील, ह.भ.प निवृत्ती महाराज रायते, भास्कर महाराज रसाळ, जाणू महाराज वाढू, संपत सकाळे, सुरेश गंगापुत्र, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, स्वप्नील शेलार, भूषण अडसारे आदी उपस्थित होते. यावेळी सदस्यांना नियुक्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वारकरी संप्रदायात भरीव कामगिरी करून प्रत्येक गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करावे, असे आवाहन दिनकर पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना केले.
नवनियुक्त पदाधिकारी
अध्यक्ष शिवाजी कसबे , उपाध्यक्ष शिवाजी मेढे, शहरध्यक्ष किरण चौधरी, मुख्य सचिव सुनील बोडके, ज्ञानेश्वर मेढे, रामनाथ बोडके, रावसाहेब कोठुळे, तानाजी कड, रंगनाथ मिंदे, पांडुरंग आचारी.