शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

Maharashtra Election 2019: अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा ‘टेंपो’ खाली आणला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 05:36 IST

छगन भुजबळ : १९९९ मध्ये वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे दिले होते आश्वासन Maharashtra Election 2019:

- राजा मानेयेवला (नाशिक) : ईडीच्या संदर्भात शरद पवार यांनी पुकारलेल्या आंदोलनाने उच्च ‘टेंपो’ गाठला होता. अजित पवारांच्या राजीनाम्याने सगळा ‘फोकस’ दुसरीकडे वळला आणि शरद पवारांनी आंदोलनाने उभा केलेला जनमानसाचा ‘टेंपो’ खाली आला. अजित पवारांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नव्हती पण तो त्यांनी दिला, असे उद्विग्न उद्गार राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना काढले.छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील येवला या मतदारसंघात त्यांची भेट घेतली.

सर्व विरोधक एकवटल्याने निवडणूक तुम्हाला जड चाललीय म्हणे!...अहो, सोप्पी म्हणा! उलट मला निवडणूक सोपी झालीय. कारण मतदारांना विकास आणि माझे काम कळते.पण राष्टÑवादी काँग्रेसच्या राज्याच्या प्रचारापासून तुम्ही अलिप्तच का दिसता?नाशिक जिल्ह्यावर सध्या मी लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे १५ उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीला लागलो आहे. त्यामुळे राज्यात अजून फिरायला सुरुवात केलेली नाही. पण लवकरच करणार आहे.राष्टÑवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले. तुम्हीदेखील निघाल्याची चर्चा होती. तुम्ही गेला नाहीत की त्यांनीच तुम्हाला घेतले नाही?ही सगळी चर्चा तुम्ही मीडियावाल्यांनी घडवून आणली. बाकी मी आहे तिथेच आहे!सुशीलकुमार शिंदेंसारखा ज्येष्ठ काँग्रेस नेता राष्टÑवादीचे काँगे्रेसमध्ये विलीनीकरण व्हावे अशी भावना व्यक्त करतो, तुमची काय भावना?आज त्या विषयाला महत्त्व नाही. अजित पवारांचा राजीनामा असेल नाही तर हा विलनीकरणाचा विषय विरोधी पक्षाचा ‘फोकस’ बदलण्याचा प्रयत्न सतत काही मंडळी करताहेत!शरद पवारांसारखा नेता ‘वन मॅन आर्मी’ शैलीत राज्यभर फिरतोय. बाकी नेत्यांचे काय?नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघ असून त्यापैकी १० राष्ट्रवादीलाआणि पाच काँग्रेसला सुटलेले आहेत. १५ पैकी आघाडीचे किमान १२ आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. शेवटी आमदार निवडून आणणे महत्त्वाचे असून या १५ आमदारांचा आपण प्रचार करत आहे. तसेच १४ आॅक्टोबरला महाराष्ट्रातील कर्जत, वैजापूर या मतदार संघात जाणार आहे.शरद पवारांवर ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला तर अजित पवारांनी राजीनामा दिला. तुम्ही संकटात असताना तुमच्या मदतीला पक्षाचे कोण आले?राष्टÑवादी काँग्रेस पक्ष माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला. शरद पवार आणि आम्ही सर्वजण पक्ष बांधणीसाठी सतत कार्यरत राहूच.राज ठाकरे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडणूक द्या म्हणतात मग विरोधी पक्षाची राष्टÑवादीची संधी जाणारच म्हणायचं का?हो! राष्टÑवादीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे विरोधात बसायचा प्रश्नच नाही.आघाडी सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक करणे ही चूक होती व ती एका ज्येष्ठ नेत्याच्या दबावामुळे घडली, असे अजित पवार एका मुलाखतीत म्हणाले आहे. ते ज्येष्ठ नेते तुम्हीच तर नाही ना?खरं तर १९९९ मध्ये ज्यावेळी आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी उतरलो, त्यावेळी आमच्या वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, असं होतं. १९९५ मध्ये जेव्हा युतीचं सरकार होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरुद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच ठेवण्यात आली होती. ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी माझी देखील स्थिती झाली होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. मात्र हा मुद्दा आता संपला आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019