शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांची डोकेदुखी थांबता थांबेना! झिरवळांचे पुत्र जयंत पाटलांच्या मेळाव्याला उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 16:23 IST

नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या निष्ठावान संवाद मेळाव्यास उपस्थित होते.

Ajit Pawar NCP ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला गळती लागली असून एकामागोमाग एक नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरू लागले आहेत. अशातच अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे आहेत. कारण राष्ट्रवादीचे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या निष्ठावान संवाद मेळाव्यास उपस्थित राहिले आहेत. तसंच माझी निष्ठा शरद पवार यांच्यावर असल्याचंही गोकुळ झिरवळ यांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना गोकुळ झिरवळ म्हणाले की, " आम्ही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना निवडून आणले. कार्यकर्त्यांची इच्छा होती की, आपण भास्कर भगरे यांच्याबरोबर राहायला हवे. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला होता. माझ्या वडिलांची निष्ठा अजित पवारांवर आहे. कुटुंब व्यवस्था वेगळी आणि राजकारण वेगळं आहे. त्यांची अजित पवार यांच्यावर आणि माझी शरद पवार यांच्यावर निष्ठा आहे. मात्र माझ्या वडिलांनीही आता शरद पवार यांच्याकडे यावं," अशी साद गोकुळ झिरवळ यांनी घातली आहे. नरहरी झिरवळ यांचीही भूमिका तळ्यात-मळ्यात

गतवर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्यासोबत आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून झिरवळ यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली. कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नरहरी झिरवळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय असल्याची चर्चा होती. तेव्हापासूनच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र झिरवळ यांनी विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत याबाबतचा निर्णय घेणं टाळल्याचं दिसत आहे.

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळdindori-acदिंडोरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार