शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

कमी मार्क मिळवूनही अजित पवार गुणवत्ता यादीत

By श्याम बागुल | Updated: February 1, 2020 20:34 IST

नाशिक मुक्कामी तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची ही पहिलीच भेट असल्याने त्यांच्यासोबत भल्या पहाटे शपथविधी सोहळ्यासाठी हजर असलेल्या व नंतर परत माघारी फिरलेल्या नाशिकमधील राष्टवादीच्या आमदारांना हर्षाेल्हास होणे

ठळक मुद्देअजित पवार यांनी त्यावेळी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला होता याचे कोडेअजित पवार यांनी जे काही व्यावहारिक ज्ञानाचे गणित मांडले

श्याम बागुलपरीक्षेत कमी मार्क मिळवूनही निव्वळ व्यवहारी ज्ञान नसल्यामुळे गुणवत्ता यादीत आलेल्यांनाही मागे रहावे लागते, असा स्वानुभव कथन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांची करमणूक करून भाजपला व पर्यायाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला असला तरी, पाठीशी बोटावर मोजण्याइतपत आमदारांचे पाठबळ असतानाही चक्क भाजपच्या मुख्यमंत्र्यांसमवेत उपमुख्यमंत्रिपदाची भल्या पहाटे शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना त्यावेळी कोणते व्यावहारिक ज्ञान होते हे सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असतानाही स्पष्ट होऊ शकलेले नाही. एक मात्र खरे भाजपशी सत्तास्थापन करण्यासाठी हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात स्वपक्षातून पहिल्यांदाच निषेधाचे मोठ्या प्रमाणात सूर निघू लागल्यानंतर पवार यांना आपल्यातील व्यावहारिक ज्ञानाची तत्काळ प्रचिती आली असावी व त्यातूनच त्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला असावा, असा अर्थ त्यातून काढण्यास हरकत नसावी.

उत्तर महाराष्टच्या विकासाच्या दृष्टीने आगामी वर्षाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी अजित पवार हे दोन दिवस नाशिक मुक्कामी तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची ही पहिलीच भेट असल्याने त्यांच्यासोबत भल्या पहाटे शपथविधी सोहळ्यासाठी हजर असलेल्या व नंतर परत माघारी फिरलेल्या नाशिकमधील राष्टÑवादीच्या आमदारांना हर्षाेल्हास होणे स्वाभाविकच होते. त्यामुळे अजित पवार यांच्याभोवती स्थानिक राजकारण्यांचे कोंडाळे जमलेले असताना राज्यात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसतानाही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे व ५४ आमदार असलेल्या राष्टवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणे यावर चर्चा होणे अपेक्षित होते. त्यामुळे परीक्षेत कमी मार्क मिळविणारा व्यवहारात हुशार असतो त्यामुळे तो पुढे जातो. जास्त मार्कवाला नुसता डोक्यानेच जास्त, पण व्यवहारात कमी असतो. व्यावहारिक ज्ञानामुळे आम्ही सत्तेत असल्याचे विधान करून अजित पवार यांनी भाजपला अज्ञानी ठरविले. मात्र भाजपला जास्त मार्क मिळालेले माहिती असतानाही अजित पवार यांनी पक्षाशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करून भल्या पहाटे शपथविधी उरकून घेतला. परंतु ज्या सहकाऱ्यांच्या बळावर पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यांनी अवघ्या तीन तासात घूमजाव करून पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्वत:ला कमी मार्क मिळूनही व्यावहारिक ज्ञान अधिक असल्याचा दावा करणा-या अजित पवार यांना अवघ्या ८२ तासांत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यावेळी त्यांच्या व्यावहारिक ज्ञानाची प्रचिती अवघ्या देशाला आली. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवसांचा कालावधी जवळ आलेला असतानाही अद्यापही अजित पवार यांनी त्यावेळी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला होता याचे कोडे उलगडलेले नाही. नाशिक मुक्कामी बोलताना मात्र अजित पवार यांनी जे काही व्यावहारिक ज्ञानाचे गणित मांडले ते पाहता, जास्त गुण मिळविणा-या भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना नुसताच डोक्याने विचार केला. तर पवार यांनी त्यांच्या सोबत जाताना व्यावहारिक ज्ञानाचा वापर करून भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे ज्या काही राजकीय उलथापालथी झाल्यात त्यात ‘भाजप नको’ या एकमेव विचाराने शिवसेना, राष्टवादी व कॉँग्रेसला तातडीने एकत्र यावे लागले व त्यातून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, असा त्यातून अर्थ निघत असेल तर अजित पवार यांना असलेले व्यावहारिक अगाध ज्ञान काका शरद पवार यांनाही ज्ञात नसावे असे मानावे काय? एकमात्र खरे पाठीशी आठ ते दहा आमदारांचे (म्हणजेच कमी गुण) असतानाही थेट भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेणा-या अजित पवार यांच्यावर बंडखोरी केल्याबद्दल कारवाई होण्याऐवजी महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्रिपद बहाल करून त्यांच्यातील कमी गुणांचे केलेले कौतुक एकमेव राष्टवादी कॉँग्रेस पक्षातच होऊ शकते हे निश्चित !

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस