शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

औद्योगिक वसाहतीला वायुप्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:20 IST

प्रदूषणविरहित हरित शहर अशी नाशिकची असलेली ओळख पुसली जात असून, आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेले शहर अशी नाशिकची अवस्था होऊ लागली आहे.

नाशिक : प्रदूषणविरहित हरित शहर अशी नाशिकची असलेली ओळख पुसली जात असून, आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेले शहर अशी नाशिकची अवस्था होऊ लागली आहे. औद्योगिक वसाहतीसह शहर परिसरही वायुप्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालला असताना, प्रदूषण नियंत्रण विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने अद्याप गेल्या एप्रिल महिन्याची प्रदूषणाची आकडेवारीही संकेतस्थळावर अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रदूषणाविषयी तांत्रिकदृष्ट्या असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय प्रदूषणाची वास्तविकता लपविण्याचा प्रयत्न करीत आहे काय, असा सवाल निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या परिसरात धूलिकणांचे प्रमाण अधिक असल्याचे गेल्या काही दिवसांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीतील एसपीएम (सस्पेंड पार्टिकुलेट मॅटर- १० मायक्रॉन आणि त्यापेक्षा कमी आकाराचे धूलिकण) मोठ्या प्रमाणात वाढले असून, संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार वातावरणातील एसपीएमच्या घटकांनी प्रदूषण मापनाच्या प्रत्येकवेळी कमाल मर्यादा ओलांडल्याचे दिसून येते, तर रहिवासी परिसरात मार्च महिन्यातील आक डेवारीनुसार १० मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या धूलिकणांचे म्हणजे श्वसनातून शरीरात पोहोचणाºया हानिकारक घटकांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारीपासून मार्चपर्यंतच्या तीन महिन्यांत २६ वेळा प्रदूषणाची चाचणी करण्यात आली. त्यात महिन्यात तब्बल ९ वेळा वातावरणातील धूलिकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच काळात वातावरणातील धूलिकणांचे अर्थात आरएसपीएमचे किमान प्रमाण ३२ एम क्यूबपर्यंत पोहोचले असून, कमाल प्रमाणाने तब्बल १७३ एमक्यूबचा टप्पा गाठला आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीत १ जानेवारी ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत किमान एसपीएम घटकाचे प्रमाण ६२ एमक्यूब, तर कमाल २९९ एमक्यूब नोंदवले गेले असून, सस्पेंड पार्टिकुलर मॅटर अर्थात एसपीएम घटकांवर नियंत्रण मिळविण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला एकदाही यश आलेले नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.जनजागृती होईल कशी?महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरील आकडेवारी नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करते. अधिक यांना आणि नागरिकांना कोणत्या भागात प्रदूषणाचे प्रमाण किती आहे, तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी करावयाची उपाययोजना करता येणे शक्य आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून संकेतस्थळावर आकडेवारीच अद्ययावत केलेली नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातील अधिकाºयांचीच जागरूकता करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी