एअर मार्शल चौधरी यांची ओझर रिपेअर डेपोला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:49 IST2020-02-12T00:49:02+5:302020-02-12T00:49:31+5:30
भारतीय वायुसेनेतील अतिविशेष सेवा पदकप्राप्त एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी मंगळवारी (दि.११) ओझर स्टेशन येथील ११ बेस रिपिएर डेपोची पाहणी करून येथील कर्मचाऱ्यांना तांत्रिक विषयासंदर्भात मार्गदर्शन केले.

एअर मार्शल शशिकर चौधरी यांचे स्वागत करताना ओझर येथील ११ बीआरडीचे एअर कमोडर पी. एस. सरीन.
नाशिक : भारतीय वायुसेनेतील अतिविशेष सेवा पदकप्राप्त एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी मंगळवारी (दि.११) ओझर स्टेशन येथील ११ बेस रिपिएर डेपोची पाहणी करून येथील कर्मचाऱ्यांना तांत्रिक विषयासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत एअर फोर्स वाइफ्स वेल्फेअर असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्ष अनिता चौधरी यांचेही ओझर येथे आगमन झाले असून, ११ बीआरडीचे एअर कमोडर पी. एस. सरीन यांनी त्यांचे स्वागत केले.
एअर मार्शल शशिकर चौधरी मंगळवार व बुधवार असे दोन दिवस ओझर स्टेशन येथील ११ बीआरडीची पाहणी करणार असून, त्यांनी ११ बीआरडीच्या विविध विभागांना भेट देऊन सुखोई ३० एमकेआई आणि मिग-२९ अद्ययावतीकरणाच्या कामाची माहिती घेतली. येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी कर्मचाºयांना लढाऊ विमानांच्या अद्ययावतीकरणासोबतच देखभाल दुरुस्तीसंदर्भातील तांत्रिक विषयांचे मार्गदर्शन केले.
अनिता चौधरी यांनी वायुसेना स्टेशनतर्फे संचलित वायुदलातील जवानांच्या परिवारासाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी सुविधांचा आढावा घेतला असून, संघटनेतर्फे चालविल्या जाणाºया उम्मीद विद्या किरण विद्यालयालाही त्यांनी भेट घेऊन येथील सोयीसुविधांसोबत कार्यपद्धतीची माहिती घेतील.