हवा हवासा वाटणारा नेता हरपला, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सूर आर.आर.पाटील शोकसभा, जिल्हा परिषद
By Admin | Updated: February 21, 2015 01:37 IST2015-02-21T01:37:29+5:302015-02-21T01:37:56+5:30
हवा हवासा वाटणारा नेता हरपला, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सूर आर.आर.पाटील शोकसभा, जिल्हा परिषद

हवा हवासा वाटणारा नेता हरपला, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सूर आर.आर.पाटील शोकसभा, जिल्हा परिषद
नाशिक : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे जनक असलेले माजी ग्रामविकासमंत्री व उपमुख्यमंत्री कै. आर. आर. पाटील हे राज्यातील सर्वपक्षीय घटकांना हवेहवेसे व्यक्तिमत्त्व होते, असा सूर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांच्या निधनानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत सर्वपक्षीय लोेकप्रतिनिधींनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती उषा बच्छाव, शोभा डोखळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आदि उपस्थित होते. यावेळी दिवंगत आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहताना उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी आर. आर. पाटील यांच्या दिंडोरी येथील कादवा कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या भेटीतील प्रसंगाला उजाळा दिला. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सांगितले की. आर. आर. पाटील हे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे जनक होते. त्यांच्या जाण्याने ग्रामीण भागाची फार मोठी हानी झाली आहे. त्यांनी ग्रामविकासमंत्री म्हणून काम करताना ग्रामीण भागातील सर्वच राजकीय पक्षांना व घटकांना सामावून घेतल्याने ते सर्व घटकांना हवा हवासा वाटणारे नेते होेते, तर सभापती उषा बच्छाव, जिल्हा परिषद सदस्य केरू पवार, गोरख बोडके, शैलेश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. अधिकाऱ्यांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी, तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विजयकुमार हळदे यांनी आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शोकसभेस जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, प्रवीण गायकवाड, साईनाथ मोरे, संगीता ढगे, विलास माळी, अर्जुन बर्डे, नितीन पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, कार्यकारी अभियंता विष्णु पालवे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुंडलिक बागुल आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी) फोटो कॅप्शन- २० पीएचएफबी- ९३ - माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानिमित्त जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोेरात सभागृहात आयोजित शोकसभेत बोलताना अध्यक्ष विजयश्री चुंबळे, डावीकडून संदीप माळोदे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती उषा बच्छाव, शोभा डोखळे आदि.