एड्सचा ‘हेल्पलाइन क्रमांक 1097’ टोल पावतीवर
By Vijay.more | Updated: August 19, 2018 00:15 IST2018-08-18T23:29:33+5:302018-08-19T00:15:56+5:30
पोलीस, अग्निशमन, अॅम्ब्युलन्स, आपत्ती व्यवस्थापन यावेळी नागरिकांच्या मदतीसाठीचे अनुक्रमे १००, १०१, १०२, १०८ हे शासनाचे हेल्पलाइन क्रमांक नागरिकांच्या चांगलेच परिचित आहेत़ मात्र, एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत असलेली १०९७ ही हेल्पलाइन बहुतांशी नागरिकांना अद्याप माहिती नाही़ एड्ससाठी जोखीमग्रस्त घटक असलेल्या ट्रक ड्रायव्हर्सना या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती व्हावी यासाठी दोडी बु।। येथील ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक विलास बोडके यांच्या प्रयत्नातून नाशिक - पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाक्यावरील पावतीवर हा हेल्पलाइन क्रमांक असलेली पावती दिली जात आहे़

एड्सचा ‘हेल्पलाइन क्रमांक 1097’ टोल पावतीवर
नाशिक : पोलीस, अग्निशमन, अॅम्ब्युलन्स, आपत्ती व्यवस्थापन यावेळी नागरिकांच्या मदतीसाठीचे अनुक्रमे १००, १०१, १०२, १०८ हे शासनाचे हेल्पलाइन क्रमांक नागरिकांच्या चांगलेच परिचित आहेत़ मात्र, एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत असलेली १०९७ ही हेल्पलाइन बहुतांशी नागरिकांना अद्याप माहिती नाही़ एड्ससाठी जोखीमग्रस्त घटक असलेल्या ट्रक ड्रायव्हर्सना या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती व्हावी यासाठी दोडी बु।। येथील ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक विलास बोडके यांच्या प्रयत्नातून नाशिक - पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाक्यावरील पावतीवर हा हेल्पलाइन क्रमांक असलेली पावती दिली जात आहे़
दोडी बु।। येथील ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या लाभार्थ्यांना आयसीटीसी विभागांतर्गत समुपदेशन, सल्ला, औषधोपचाराचे काम करणाºया बोडके यांना काहीतरी वेगळे करायचे होते़ त्यांनी एड्सचा सर्वाधिक जोखीम असलेला घटक ट्रक ड्रायव्हर यांना एड्स नियंत्रण हेल्पलाइन क्रमांक १०९७ हा माहिती व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले़