अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा : डॉ. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:29+5:302020-12-05T04:21:29+5:30

मालेगाव. : अहिराणी खान्देश व कसमादेची अस्मिता असून, लाखोंच्या तोंडावरची गोड बोली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही तिचा गोडवा ...

Ahirani should get standard language status: Dr. Patil | अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा : डॉ. पाटील

अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा : डॉ. पाटील

मालेगाव. : अहिराणी खान्देश व कसमादेची अस्मिता असून, लाखोंच्या तोंडावरची गोड बोली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही तिचा गोडवा कायम आहे. अहिराणीला सरकारने प्रमाण भाषेचा दर्जा देऊन खान्देशचा सन्मान करावा, असे प्रतिपादन डॉ. एस. के. पाटील यांनी केले.

येथील राष्ट्र सेवा दलातर्फे कवयित्री बहिणाबाई यांच्या स्मृती दिनानिमित्त गुरुवारी सेवा दल सभागृहात अहिराणी कविसंमेलन घेण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पाटील बोलत होते. यावेळी सुनील वडगे, नचिकेत कोळपकर, तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंखे, तालुका संघटक सारंग पाठक, जिल्हा संघटक रविराज सोनार उपस्थित होते. बहिणाबाईंच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

प्रास्ताविक नचिकेत कोळपकर यांनी केले. कविसंमेलनात भिला महाजन, देवदत्त बोरसे, नाना महाजन, शैलेश चव्हाण, विवेक पाटील, आबा आहेर, शिवदास निकम, कैलास भामरे, समाधान भामरे, भरत पाटील, सतीश कलंत्री यांनी अहिराणी कविता सादर केल्या. राजेंद्र दिघे यांनी सूत्रसंचालन केले. आभार सारंग पाठक यांनी मानले. यावेळी रमेश उचित, नाना शेवाळे, रेखा उगले, अशोक फराटे, अशोक पठाडे यांच्यासह अहिराणी साहित्यप्रेमी व रसिक उपस्थित होते.

Web Title: Ahirani should get standard language status: Dr. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.