द्राक्ष निर्यातदाराकडून लाच घेताना कृषी उपसंचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 23:41 IST2020-03-03T23:39:42+5:302020-03-03T23:41:04+5:30

नाशिक : द्राक्ष निर्यातदारांना फायटो प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना कृषी उपसंचालक नरेंद्र अघाव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. ३) रंगेहात पकडले. अघाव यांनी एका द्राक्ष निर्यातदाराकडे सुमारे पावणेदोन लाखांची मागणी केली होती.

 Agriculture sub-director arrested for taking bribe from grape exporter | द्राक्ष निर्यातदाराकडून लाच घेताना कृषी उपसंचालकास अटक

द्राक्ष निर्यातदाराकडून लाच घेताना कृषी उपसंचालकास अटक

ठळक मुद्दे निर्यातदाराकडे १ लाख ६४ हजार रुपयांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : द्राक्ष निर्यातदारांना फायटो प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना कृषी उपसंचालक नरेंद्र अघाव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. ३) रंगेहात पकडले. अघाव यांनी एका द्राक्ष निर्यातदाराकडे सुमारे पावणेदोन लाखांची मागणी केली होती.
द्राक्ष निर्यातीसाठी कृषी उपसंचालक कार्यालयाच्या सही, शिक्क्यानिशी फायटो प्रमाणपत्राची गरज भासते. हे प्रमाणपत्र देण्याकरिता अघाव यांनी निर्यातदाराकडे १ लाख ६४ हजार रुपयांची मागणी केली होती. पथकाने अघाव यांना त्यांच्याच कार्यालयात पकडले. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title:  Agriculture sub-director arrested for taking bribe from grape exporter