लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्याने ती उगवणीवर मोठा परिणाम दिसून आल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाच्या दृष्टीने सोयाबीन पिक हे अतिशय महत्वाचे मानले जाते. परंतु काही शेतकरी वर्गाने आपल्या घरातील जुने सोयाबीन बियाणे व काही ठिकाणीहुन नवीन बियाने खरेदी केल्याने त्याची उगवण क्षमता न तपासणी केल्यामुळे सोयाबीन उगवणीवर त्यांचा परिणाम होतांना दिसत आहे.सोयाबीनचे पिक वाचविण्यासाठी आता दिंडोरी तालुक्याचे कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी सोयाबीन पिक उत्पन्न वाढीसाठी बळीराजांला मार्गदर्शनपर सल्ला दिला आहे. सोयाबीन पेरणी करतांना शेतकरी वर्गाने योग्य नियोजन करून पेरणी करावी. त्यासाठी शेतकरी वर्गाने अगोदर जमिनीतील ओलीचे प्रमाण कसे आहे. याची पडताळणी करणे गरजेचे आहे. कारण तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळते. शेतीत जर ओल अत्यंत कमी असेल तर त्याठिकाणी सोयाबीन पिक जोमाने येणार नाही. साधारणपणे शेकडा ६० ते ७० टक्के जर जमिनीत ओल असेल तर त्याठिकाणी सोयाबीन पिक घेण्यास उत्तम राहाते.परंतु जमिनीत शेकडा २० ते २५ टक्के ओल सोयाबीन पिकास हानीकारक राहाते. या सर्व गोष्टींचे नियोजन करणे गरजेचे आहे. तेव्हाच सोयाबीन पिक शेतकरी वर्गाला चांगले घेता येईल.सोयाबीन पिक शेतकरी वर्गासाठी सोनेरी पिक मानले जाते. हे पिक उगवण झाल्यानंतर त्याची जोपसना हाही एक महत्वाचा भाग मानला जातो. या पिकावर साधारणपणे नागआळी, गोगलगाय, लष्करी आळी, तुडतुडे याचा लवकर प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी शेतकरी वर्गाने निबोळी अर्कचा जर वापर केला तर पिकावरील कोणत्याही प्रकारचे रोग, वेगवेगळ्या आळीचे आक्र मण यापासून संरक्षण मिळते. असे ही तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले.प्रतिक्रि या...शेतकरी वर्गाने कुठलेही पिक घेताना अगोदर जमिनीतील माती परिक्षण, प्रतवारी, ओलावा यांचे योग्य नियोजन करून मगच पेरणी करावी. त्यामुळे उत्पन्नाची टक्केवारी वाढण्यासाठी शेतकरी वर्गाला चांगली मिळते.- अभिजीत जमधडे, कृषी अधिकारी, दिंडोरी तालुका. (फोटो ३० सोयाबीन)
सोयाबीनचे पिक वाचविण्यासाठी कृषी अधिकारी धावले मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 16:17 IST
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्याने ती उगवणीवर मोठा परिणाम दिसून आल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.
सोयाबीनचे पिक वाचविण्यासाठी कृषी अधिकारी धावले मदतीला
ठळक मुद्देलखमापूर परिसरात बियाणे खराब निघाल्याने शेतकरी नाराज