मंत्र्याच्या पाहणी दौऱ्यात कृषी अधिकारी गायब
By Admin | Updated: March 4, 2015 01:10 IST2015-03-04T01:08:59+5:302015-03-04T01:10:45+5:30
मंत्र्याच्या पाहणी दौऱ्यात कृषी अधिकारी गायब

मंत्र्याच्या पाहणी दौऱ्यात कृषी अधिकारी गायब
नाशिक : दोन दिवस झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाने शेती पिकाचे केलेले नुकसान व अशा नुकसानीचा अंदाज बांधताना यंत्रणांची होणारी दमछाक या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी अचानक आयोजित केलेली नुकसानग्रस्त भागाची पाहणी कृषी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीतच पार पडली. बराच वेळ वाट पाहूनही कृषी अधिकाऱ्यांचा पत्ता लागत नसल्याने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाच या दौऱ्यात सहभागी होऊन कृषी विभागाचा अतिरिक्त कारभार हाकावा लागला. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिल्याने व त्याची माहिती तत्काळ शासनाला सादर करण्याचे फर्मान सोडल्याने महसूल व कृषी विभाग सोमवारपासून कामाला जुंपला असतानाच, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्'ातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असे वरिष्ठ अधिकारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साप्ताहिक आढावा बैठकीस उपस्थित असताना त्यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरविलीच; परंतु ज्या कृषी खात्याशी संबंधित अवकाळी पावसाची बाब आहे, त्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनीही मंत्र्यांच्या दौऱ्यात गैरहजेरी लावली. परिणामी शासकीय विश्रामगृहावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्'ात दोन दिवस झालेला पाऊस, नुकसानीचा अंदाज घेत शिंदे यांनी सय्यद पिंप्री, ओझर, जिव्हाळी, कसबे-सुकेणे, कोकणगाव आदि गावांना भेटी देत द्राक्ष व गहू या पिकांची पाहणी केली.