अखंड हरिनाम सप्ताहात कृषी प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:02 IST2019-08-05T18:02:28+5:302019-08-05T18:02:43+5:30
तळवाडे : शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अखंड हरिनाम सप्ताहात कृषी प्रदर्शन
येवला : तालुक्यातील तळवाडे येथे सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७२ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रांगणात सप्ताह कमिटीच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.विनामूल्य असलेल्या या प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत सप्ताह कमिटीच्या वतीने भव्य कृषी प्रदर्शन भरविण्यात आले असून त्यात अनेक शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट तसेच कृषी आधारित व्यवसायातील मंडळी सहभागी होत आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने येवला कृषी विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर शेतकºयांना शेतीच्या नव्या वाटा शोधण्याची संधी उपलब्ध होत असून, मक्यावरील लष्करी अळी, कपाशीवरील गुलाबी बोण्डअळी याबाबत शेतकºयांना तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब पाटोळे, भाऊसाहेब काळोखे, मंडळ कृषी अधिकारी के.वाय. सिद्दीकी, डी.जी. गायके, क्षिरसागर, कृषी सहायक जयश्री जाधव, कल्पना आहेर, मोरे, संतोष गोसावी, वारु ळे आदी मार्गदर्शन करत आहेत.
प्रदर्शनात कृषी खात्यासह शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, बँका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, औजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, प्रक्रि या उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअरेज उद्योग, ड्रिप, टिश्यू कल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी झाल्या आहेत. याशिवाय आॅटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, पशुखाद्य, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचे स्टॉल्सदेखील शेतकºयांना बघायला मिळत आहेत. आदर्श शेती, शेतीपूरक व्यवसायातील तंत्र, प्रयोग तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, फळे तसेच कलमे रोपे, गांडुळखत याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.