...तर आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा आदिवासी मंत्र्याच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा बारा दिवसांपासून आंदोलन सुरूच : शिक्षणमंत्री तावडेंना निवेदन
By Admin | Updated: March 9, 2015 00:25 IST2015-03-09T00:25:13+5:302015-03-09T00:25:37+5:30
...तर आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा आदिवासी मंत्र्याच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा बारा दिवसांपासून आंदोलन सुरूच : शिक्षणमंत्री तावडेंना निवेदन

...तर आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा आदिवासी मंत्र्याच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा बारा दिवसांपासून आंदोलन सुरूच : शिक्षणमंत्री तावडेंना निवेदन
नाशिक : आदिवासी विभागाच्या दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्नावर सरकारने येत्या तीन दिवसांत निर्णय न घेतल्यास आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या मतदारसंघातील घरावर गुरुवारपासून पायी मोर्चा काढून बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे़ दरम्यान, रविवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवार (दि़२५) सुरू करण्यात आलेले आंदोलन बाराव्या दिवशीही सुरूच होते़ आदिवासी विकास विभागाच्या दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळेत तुटपुंज्या मानधनावर काम करणारे हे कंत्राटी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत़ सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे़ या काळात सुमारे ७० आंदोलकांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ रविवारी कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची संदीप भाबड, एस़ पी़ गावित, रितेश ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले़ राज्य सरकारमध्ये विरोधी पक्षनेते असताना विनोद तावडे यांनी या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे पत्र दिले होते़ तसेच येत्या तीन दिवसांत आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास गुरुवारी पायी मोर्चाद्वारे आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्या मतदारसंघातील घरासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशाराही आदोलकांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)