जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट

By Admin | Updated: June 26, 2014 01:16 IST2014-06-26T01:12:15+5:302014-06-26T01:16:35+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट

Agent settlement at the Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट

जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट

 

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिले जाणारे विविध दाखले परस्पर देत असल्याच्या संशयावरून सुभाष सानप या एजंटास सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ रेशन कार्डवरील वडिलांचे नाव कमी करण्याच्या दाखल्यासाठी आलेल्या एका नागरिकाने तहसीलदारांक डे केलेल्या तक्रारीवरून हा प्रकार समोर आला़ शासनाची फ सवणूक केल्याप्रकरणी सानपवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, दहावी-बारावीच्या निकालानंतर आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी एजंटांकडून अडवणूक व आर्थिक लूट केली जात आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील झा यांच्याकडून वडिलांचे रेशन कार्डवरील नाव कमी केल्याची मूळ प्रत हरवली़ मात्र त्यांच्याकडे त्याची झेरॉक्स प्रत होती़ त्यांनी तहसीलदार गणेश राठोड यांच्याकडे या दाखल्याची दुसरी मूळ प्रत मिळावी यासाठी अर्ज केला़ या अर्जावरून राठोड यांनी रजिस्टर तपासले असता कार्यालयाकडून असा दाखलाच दिला गेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी ताबडतोब झा यांना बोलावून घेऊन याबाबत विचारणा केली असता हा दाखला सुभाष सानप या एजंटकडून काढून घेतल्याची माहिती
दिली़
तहसीलदार राठोड यांनी झा यांच्यासोबत कार्यालयातील दोन माणसे पाठवून एजंट सानपचा शोध घेण्यास सांगितले़ त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बसलेल्या एजंट सानपला पकडून तहसीलदारांसमोर हजर करण्यात आले़ या दाखल्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता हा दाखला मी दिला नसल्याचे सानपने सांगितले़
दरम्यान, तहसीलदार गणेश राठोड यांना त्याच्याकडील पिशवीचा संशय आल्याने त्यांनी पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या सह्या व शिक्के असलेले उत्पन्नाचे, नॉन क्रिमिलिअरचे, राष्ट्रीयत्वाचे दाखले, तसेच रेशन कार्ड काढण्यासाठीचे भरलेले अर्ज आढळून आले़
तहसीलदार राठोड यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात फ ोन करून एजंट सानपला पोलिसांच्या ताब्यात दिले़ या घटनेवरून एजंटांकडून शासनासह नागरिकांची फ सवणूक होत असल्याचे समोर आले आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयातही एजंटांचा सुळसुळाट झाला असून, याकडे जिल्हाधिकारी लक्ष देत नसल्याचेच दिसून येते़ यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयातून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची बनावट शिधापत्रिका बनविण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते़ या प्रकारामध्ये सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Agent settlement at the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.