पुन्हा स्वाइन फ्लूचा रुग्ण

By Admin | Updated: August 7, 2014 01:26 IST2014-08-07T01:22:16+5:302014-08-07T01:26:28+5:30

पुन्हा स्वाइन फ्लूचा रुग्ण

Again swine flu patients | पुन्हा स्वाइन फ्लूचा रुग्ण

पुन्हा स्वाइन फ्लूचा रुग्ण

 

नाशिक : शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढतच असून, चालू महिन्यात आणखी पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दोन महिन्यात २५ रुग्ण झाले आहेत. त्यातच जेलरोड भागात आणखी एक स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, पालिकेचा गलथानपणा यानिमित्ताने दिसत असून, डास निर्मूलनाचा ठेका संपून आठ महिने झाले तरी अद्याप नवीन ठेकेदार नियुक्त झालेला नाही.
शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे रोगराईचे वातावरण आहे. दोन महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्णदेखील आढळत आहेत. आत्तापर्यंत शहराच्या विविध भागांत २५ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. आॅगस्ट महिन्यात त्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण गंजमाळ, कालिका मंदिर झोपडपट्टी, पाथर्डी फाटा, शिवाजीनगर (नाशिकरोड) या भागातील आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या विविध भागांत आत्तापर्यंत ९० संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी जेलरोड भागात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला होता. आता आणखी एक महिला रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सदर महिलेचे वय ४५ वर्षे असून, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शहरात वाढत्या रुग्ण संख्येमुळे पालिका सतर्क होणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात मात्र कोठेही असे चित्र दिसत नाही. गेल्या डिसेंबर महिन्यात डास निर्मूलन ठेक्याची मुदत संपली आहे. त्यानंतर आठ महिने झाले तरी नवीन ठेकेदार नियुक्त झालेले नाही. पालिकेने यापूर्वी डास निर्मूलन ठेक्यासाठी निविदा मागविल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे ठेका मंजुरी रखडली. त्यानंतर स्थायी समितीची रचना आणि सभापतिपदाच्या निवडणुकीचे निमित्त करण्यात आले. आता स्थायी समिती अस्तित्वात येऊन दोन महिने झाले; परंतु अद्याप हा विषयच पटलावर आलेला नाही. सध्या ठेक्याचा विषय लेखापरीक्षकांकडे अडकला आहे, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Again swine flu patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.