शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

...पुन्हा आढळले स्त्री जातीचे नवजात शिशू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:32 IST

एकीकडे स्त्री जन्माच्या स्वागतासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न होत असून, नुकताच जागतिक महिला दिन साजरा करून नारीशक्तीचा सर्वत्र गौरव करण्यात आला. मात्र शहरात त्याचदिवशी फाळके स्मारक परिसरात स्त्री जातीचे शिशू आढळून आले. या घटनेला दोन दिवस उलटत नाही, तोच पुन्हा शनिवारी (दि.९) भारतनगर भागातील पटांगणात स्त्री जातीचे शिशू आढळून आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसंतापजनक : दोन दिवसांत दुसरी घटना; मैदानात वाऱ्यावर सोडून जन्मदात्री फरार

नाशिक : एकीकडे स्त्री जन्माच्या स्वागतासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न होत असून, नुकताच जागतिक महिला दिन साजरा करून नारीशक्तीचा सर्वत्र गौरव करण्यात आला. मात्र शहरात त्याचदिवशी फाळके स्मारक परिसरात स्त्री जातीचे शिशू आढळून आले. या घटनेला दोन दिवस उलटत नाही, तोच पुन्हा शनिवारी (दि.९) भारतनगर भागातील पटांगणात स्त्री जातीचे शिशू आढळून आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरी भागात नागरिकांच्या संवेदना मृत झाल्याचा प्रत्यय आणून देणाऱ्या या घटना लागोपाठ घडल्याने समाजाच्या वैचारिक स्तराबाबत चिंता व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतनगरजवळील घरकुल प्रकल्पाशेजारी असलेल्या नंदिनीच्या काठावरील मोकळ्या मैदानात अज्ञात महिलेने नुकतेच जन्माला आलेल्या स्त्री जातीच्या नवजात शिशुला रात्रीच्या सुमारास नागरिकांची नजर चुकवून रामभरोसे सोडून पळ काढल्याचे उघडकीस आले.ज्या जिवाला नऊ महिने आपल्या गर्भात वाढविले त्याला जन्म देऊन असे उघड्यावर टाकून फरार होणाºया निर्दयी जन्मदात्री महिलेविषयी तीव्र संतापाची भावना समाजातून व्यक्त होत आहे. मातृत्वाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असले तरी या कलियुगात अशा काही घटना सभोवताली घडत आहेत. आपल्या स्वार्थापोटी मनुष्यप्राणी कुठल्या स्तरावर जाऊन माणुसकीला काळिमा फासणारे वर्तन क रू शकतो, याचाच प्रत्यय या घटनेमधून समाजाला वारंवार येत आहे. यावरून समाज अद्यापही परिपक्व झाला नसल्याचे अधोरेखित होते.नवजात शिशुला जन्मास घालून बेवारस सोडून पळ काढणाºया अज्ञात स्त्रीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे नवजात शिशू मृतावस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी