भर दुपारी इनोव्हाची काच फोडून लॅपटॉप गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST2021-03-29T04:10:13+5:302021-03-29T04:10:13+5:30

---- पादचाऱ्याच्या हातातील मोबाइल हिसकावला नाशिक : रस्त्याच्या कडेला मोबाइलवर बोलणार्‍या एका पादचारी युवकाच्या हातातील मोाबइल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ...

In the afternoon, the glass of Innova broke and the laptop disappeared | भर दुपारी इनोव्हाची काच फोडून लॅपटॉप गायब

भर दुपारी इनोव्हाची काच फोडून लॅपटॉप गायब

----

पादचाऱ्याच्या हातातील मोबाइल हिसकावला

नाशिक : रस्त्याच्या कडेला मोबाइलवर बोलणार्‍या एका पादचारी युवकाच्या हातातील मोाबइल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना शरणपूररोडवर पी एन्ड टी कॉलनी जॉगिंग ट्रॅकजवळ घडली. याप्रकरणी शीतल विजय बोरस्ते (हनुमानवाडी, मखमलाबादरोड, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बोरस्ते हे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून मोबाइलवर बोलत होते, यावेळी मागून ट्रीपल सीट भरधाव आलेल्या दुचाकीवरील एकाने त्यांच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-----

दारूला पैसे न दिल्याने मारहाण

नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याचा राग मनात धरून कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याची घटना सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात घडली. निलेश भीमराव उबाळे (रा. सिद्धिविनायक रो-हाऊस) असे मारहाण करणार्‍या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कमलेश रामदास जाधव यांनी तक्रार दाखल केली. उबाळे याने शुक्रवारी (दि.२६) रात्री मद्याच्या नशेत जाधव यांच्या घरी येऊन दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, अशी कुरापत काढून जाधव तसेच त्यांच्या आई व पत्नीला दगडाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In the afternoon, the glass of Innova broke and the laptop disappeared