तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लोहोणेरला अत्यल्प लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:31 IST2021-06-02T00:31:00+5:302021-06-02T00:31:28+5:30
लोहोणेर : तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी लोहोणेर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली होती, तर त्यात केवळ ५० लाभार्थींना लसीकरण करण्यात आले. येथे लस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र लस आवश्यकतेपेक्षा कमी उपलब्ध झाल्याने फारच कमी लाभार्थी लस घेण्यासाठी हजर होते. मंगळवारी (दि. १) उपलब्ध झालेले ५० डोस हे पहिला डोस ४० व दुसरा डोस १० याप्रमाणे देण्यात आले.

तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लोहोणेरला अत्यल्प लस उपलब्ध
लोहोणेर : तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी लोहोणेर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली होती, तर त्यात केवळ ५० लाभार्थींना लसीकरण करण्यात आले. येथे लस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र लस आवश्यकतेपेक्षा कमी उपलब्ध झाल्याने फारच कमी लाभार्थी लस घेण्यासाठी हजर होते. मंगळवारी (दि. १) उपलब्ध झालेले ५० डोस हे पहिला डोस ४० व दुसरा डोस १० याप्रमाणे देण्यात आले.
मुळात लस उपलब्धतेसाठी दीर्घ प्रतीक्षा, त्यात अल्प प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने लोहोणेर ग्रामस्थांना अजून प्रतीक्षा करावी लागेल असे वाटते आहे. मुळात ४५ दिवसांनंतर आता दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची मुदत करण्यात आली असल्याने लाभार्थी कमी होत आहेत. लोहोणेर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत मुबलक प्रमाणावर कोविड-१९ प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.