शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ राज ठाकरे यांचेही नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन

By संजय पाठक | Updated: February 16, 2024 11:36 IST

वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार

संजय पाठक

 नाशिक- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महा अधिवेशन गेल्या महिन्याच्या अखेरीस नाशिकमध्ये पार पाडले यावेळी उद्धव ठाकरे यांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. येत्या नऊ मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन असून तो नाशिकमध्ये भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने नाशिक मध्ये जाहीर सभेचे नियोजन करण्यात येत आहे.

2006 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिक मध्ये सर्वाधिक समर्थन मिळाले. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे नाशिक शहरात तीन आमदार निवडून आले होते. तर 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत 40 नगरसेवक निवडून आले होते. पाच वर्ष मनसेने महापालिकेतील सत्ता उपभोगली होती.

या कालावधीत अनेक चांगले प्रकल्प उभारल्याचा दावा मनसेच्या वतीने केला जातो. त्यानंतर मात्र मनसेला अपेक्षित यश आलं नाही मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नाशिककडे लक्ष केंद्रित केले आहे गेल्या महिन्यात राज ठाकरे दोन दिवस नाशिक मध्ये होते. त्यानंतर आता येत्या 9 मार्चला नाशिक मध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा करण्याचे नियोजन आहे. नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सभा घेण्याचे नियोजन आहे. या संदर्भात आज मुंबई येथे बैठकही होणार आहे, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिली.